Home /News /technology /

Whatsapp वर मेसेंजर रूम बनवायची आहे? फॉलो करा या स्टेप्स

Whatsapp वर मेसेंजर रूम बनवायची आहे? फॉलो करा या स्टेप्स

कोरोना (corona)च्या संकटामुळे आजकाल सगळी काम घरातूनच (work from home) होत आहेत. अशामध्ये एखाद्या मिटींगसाठी व्हॉट्स ॲप (WhatsApp)वरून मेसेंजर चॅट रूम कशी बनवायची ते जाणून घेऊया

    मुंबई, 20 ऑक्टोबर: कोरोनाच्या या संकट काळात जवळपास सगळेच घरून काम करत आहेत. त्यामुळे ऑनलाईन मीटिंगची संख्या वाढली आहे. विविध प्रकारचे ॲप्स यासाठी उपलब्ध आहेत. अनेक ॲप्सवर या मीटिंग्स मोफत करता येत आहेत. यामध्ये फेसबुकने देखील मेसेंजर रूम्सची सेवा उपलब्ध करून दिली आहे. यात एका चॅट रूममध्ये 50 जण सहभागी होऊ शकतात. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मेसेंजर रूम्सवरील चॅटमध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला फेसबुक अकाऊंट असणं गरजेचं नाही. त्याचबरोबर व्हाट्सॲप आणि इंस्टाग्रामचा वापर करून या चॅटरूमच्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता किंवा व्हिडिओ कॉलद्वारे त्यामध्ये सहभागी होऊ शकता. व्हॉट्सअपवरून या मेसेंजर रूम्स तयार करणं फार सोपी गोष्ट असून मोबाईल, डेस्कटॉप आणि वेबसाइटवरून देखील या रूम्स तयार केल्या जाऊ शकतात. या पद्धतीने तयार करा मेसेंजर रूम्स Step 1: WhatsApp मध्ये इंडिव्हीज्युवल चॅट उघडून ॲटॅचमेंट आयकॉनवर क्लिक करा. Step 2: त्यानंतर 'रूम्स' या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 'कंटीन्यू इन मेसेंजर' असा पर्याय दिसेल. Step 3: यानंतर तुम्हाला ज्या कुणाला या चॅटमध्ये सामील करायचं आहे त्यांना तुम्ही लिंक पाठवू शकता. त्यानंतर या लिंकवर क्लिक करून ते या चॅटमध्ये सहभागी होऊ शकतात. Step 4: यावर तुम्ही ग्रुप कॉल देखील करता येतात. परंतु यासाठी तुमच्या ग्रुप कॉलमध्ये 5 किंवा त्याहून अधिक जण असायला हवेत. तसंच ग्रुप कॉल करण्यासाठी तुम्हाला उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या ऑडिओ कॉल या पर्यायावर क्लिक केल्यानंतर वरच्या पद्धतीनीच चॅटरूम तयार करता येईल.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Facebook, Whatsapp

    पुढील बातम्या