• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • ब्राउजर हिस्ट्रीमुळेही स्लो होतो इंटरनेट स्पीड; वाचा क्लियर करण्यासाठीचा सोपा मार्ग

ब्राउजर हिस्ट्रीमुळेही स्लो होतो इंटरनेट स्पीड; वाचा क्लियर करण्यासाठीचा सोपा मार्ग

Google Chrome कॅशे आणि ब्राउजिंग हिस्ट्री डिलीट केल्याने तुम्ही ऑनलाईन काय सर्च केलं, याचीही माहिती कोणाला मिळणार नाही.

 • Share this:
  नवी दिल्ली, 27 जून : अनेकदा गुगलवर (Google) काही सर्च केल्यानंतर अचानक इंटरनेट स्पीड (Internet Speed) कमी होतो. असं केवळ लॅपटॉप, कंप्यूटरचं नाही, तर स्मार्टफोनमध्येही होतं. यामुळे मोबाईलचा स्पीडही कमी होतो. ब्राउजर हिस्ट्रीमध्ये ब्राउजर डेटा, कॅशे जमा होतो आणि स्पीड कमी होतो, हे यामागचं कारण आहे. त्यामुळे हे डिलीट करणं फायद्याचं ठरतं. तसंच Google Chrome कॅशे आणि ब्राउजिंग हिस्ट्री डिलीट केल्याने तुम्ही ऑनलाईन काय सर्च केलं, याचीही माहिती कोणाला मिळणार नाही. मोबाईलमध्ये Google Chrome मधून असं डिलीट करा कॅशे आणि ब्राउजिंग हिस्ट्री - - सर्वात आधी फोनमध्ये गुगल क्रोम अॅपमध्ये जा. - त्यानंतर सेटिंगमध्ये तीन डॉटवर क्लिक करा. त्यानंतर सेटिंगवर क्लिक करा. - Privacy and security वर क्लिक करा. - एक नवं पेज ओपन होईल. यात Clear browsing data पर्यायावर क्लिक करा. - इथे काय-काय क्लियर करायचं आहे, हे विचारलं जाईल. यात browsing history, cookies and site data आणि cached images and files चा पर्याय असेल. यापैकी सिलेक्ट करावं लागेल. - त्यानंतर यात टाईम रेंजही, कधीपर्यंतचा डेटा क्लियर करायचा आहे ते सिलेक्ट करता येईल. - सर्व पर्याय सिलेक्ट केल्यानंतर क्लियर डेटावर क्लिक करा.

  (वाचा - तु्म्हीही पॉर्न सर्च किंवा तुमच्या एक्सला स्टॉक केलं आहे का? Google ने आता उचललं मोठं पाऊल)

  लॅपटॉप-कंप्यूटर - - Google Chrome ओपन करा. त्यानंतर उजव्या बाजूला वर तीन डॉटवर क्लिक करा. - More Tools> Clear browsing data वर क्लिक करा. - टाईम रेंज सिलेक्ट करा, यात all time पर्यायही निवडता येईल.

  (वाचा - Google Search Trends: फ्री पॉर्नपेक्षा या गोष्टीत भारतीयांना अधिक रस)

  - cookies and other site data आणि cached images and files समोरील बॉक्सवर सिलेक्ट करा. - शेवटी Clear data वर क्लिक करा. ऑनलाईन काय सर्च केलं कोणालाच नाही समजणार, Chrome मधून अशी डिलीट करा हिस्ट्री
  Published by:Karishma
  First published: