WhatsApp वर आलेले मेसेज गरजेनुसार असे करा क्लिन; वापरा ही सोपी ट्रिक

WhatsApp वर आलेले मेसेज गरजेनुसार असे करा क्लिन; वापरा ही सोपी ट्रिक

व्हॉट्पसअ‍ॅपवर येणारे चॅट, नको असलेले फोटो-व्हिडीओ, डॉक्युमेंट्स अशा गोष्टी क्लिन न केल्याने समस्या येऊ शकतात. पण व्हॉट्पसअ‍ॅप नेमकं क्लिन कसं कराव?

  • Share this:

नवी दिल्ली, 23 जून: स्मार्टफोनमध्ये अनेकदा WhatsApp हँग होणं किंवा स्लो प्रोसेस करणं अशा अनेक गोष्टी होत असतात. व्हॉट्पसअ‍ॅपवर येणारे चॅट, नको असलेले फोटो-व्हिडीओ, डॉक्युमेंट्स अशा गोष्टी क्लिन न केल्याने समस्या येऊ शकतात. पण व्हॉट्पसअ‍ॅप नेमकं क्लिन कसं कराव?

WhatsApp चं हे फीचर करा डिसेबल -

WhatsApp च्या स्टोरेजसह फोनचंही स्टोरेज वाढतं. हे स्टोरेज वाढल्याने फोन स्लो होतो. त्यासाठी व्हॉट्पसअ‍ॅपमध्ये मीडिया फाईल्स ऑटो सेव्ह हा ऑप्शन डिसेबल करू शकता. हे फीचर डिसेबल केल्यामुळे सर्वच फोटो-व्हिडीओ डाउनलोड होणार नाहीत.

WhatsApp असं करा क्लिन -

- सर्वात आधी WhatsApp ओपन करुन सेटिंगमध्ये जा.

- त्यानंतर डेटा आणि स्टोरेजवर टॅप करा.

- इथे सर्वात खाली Storage Uses ऑप्शन दिसेल.

(वाचा - WhatsApp वरही करता येईल Call Record, जाणून घ्या ही Simple Trick)

- Storage Uses वर टॅप केल्यानंतर सर्व चॅटची लिस्ट समोर येईल.

- इथे चेक करता येईल कोणत्या चॅटमध्ये किती स्टोरेज यूज होत आहे.

- त्यानंतर ज्या चॅटमधून डिलीट करायचं आहे, त्यावर टॅप करा.

(वाचा - Google Search Trends: फ्री पॉर्नपेक्षा या गोष्टीत भारतीयांना अधिक रस)

- इथे फोटोसह संपूर्ण लिस्ट समोर येईल.

- या लिस्टमध्ये जी गोष्ट कामाची नाही ती डिलीट करा.

यामुळे तुमचं WhatsApp क्लिन होईल आणि स्पेस वाढेल.

WhatsApp जवळपास सर्वच स्मार्टफोन युजरच्या जीवनात महत्त्वाचा भाग झाला आहे. दररोजच्या कामापासून ते ऑफिसपर्यंतची अनेक काम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Social Messaging App) होतात. आता व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फीचरबाबत मोठी चर्चा आहे. लवकरच एकाच वेळी चार अ‍ॅडिशनल डिव्हाईसमध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार आहे. ज्यामुळे युजर्स एकत्र पाच डिव्हाईसवर व्हॉट्सअ‍ॅप वापरु शकतील.

Published by: Karishma
First published: June 23, 2021, 1:04 PM IST

ताज्या बातम्या