मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Life @ 25 : Smartphone खरेदी करताना किंमत किंवा कॅमेरा नाही तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Life @ 25 : Smartphone खरेदी करताना किंमत किंवा कॅमेरा नाही तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा

जर तुम्ही फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि कोणता स्मार्टफोन घ्यायचा त्याची निवड कशी करायची. मोबाईल फोन खरेदी करताना या गोष्टी लक्षात घेतल्या तर कमी किंमतीत अधिक चांगल्या फीचर्सचा फोन तुम्ही घेऊ शकता.

  • Published by:  Kranti Kanetkar
मुंबई : बऱ्याचदा स्मार्टफोन खरेदी करताना फक्त कॅमेरा किंवा महागडा मोबाईल घेण्याचं वेड आपल्या डोक्यात असतं. महागडा मोबाईल घेतला की सगळं चांगलंच असणार अशी एक धारणा मनात असतो. तेवढ्याच चांगल्या दर्जाचे फीचर्स आपल्याला हव्या त्या किंमतीमध्ये देखील निवडता येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्मार्टफोन खरेदी करताना काही विशेष गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्या कोणत्या याबद्दल आज जाणून घेऊया. जर तुम्ही फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि कोणता स्मार्टफोन घ्यायचा त्याची निवड कशी करायची. मोबाईल फोन खरेदी करताना या गोष्टी लक्षात घेतल्या तर कमी किंमतीत अधिक चांगल्या फीचर्सचा फोन तुम्ही घेऊ शकता.

मोबाईल फोन घेण्यापूर्वी ठरवा, स्मार्टफोन घेण्याचे तुमचे बजेट किती आहे?फोन खरेदी करताना तुम्ही अशी चूक करू नये. तुम्ही तुमच्या बजेटमध्ये बसणाऱ्या फोनमधून चांगला फोन निवडायचा आहे. तुम्ही फोन कशासाठी घेताय हे महत्त्वाचं आहे. तुमचं त्यावर जर काम जास्त असेल तर तुम्हाला रॅम जास्त लागणार हा पण विचार केला पाहिजे.

अनेकदा लोक जास्त रॅम आणि स्टोरेज असलेले फोन खरेदी करतात, ज्याची त्यांना गरज नसते. अशा स्थितीत फोन खरेदी करताना विशेष काळजी घ्या की फोनमध्ये कशाची गरज आहे? त्यानुसार तुम्ही फोन विकत घ्यावा. तुम्हाला स्मार्टफोन कोणत्या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करायचा हे ठरवा. गेमिंगसाठी, कामासाठी किंवा तुमच्या इतर गरजा ओळखून त्यानुसार त्याची निवड करणं फायद्याचं ठरेल. हेही वाचा-Smartphone on Discount: तब्बल 8 हजारांनी स्वस्त मिळतोय 108MP कॅमेरा असलेला ‘हा’ स्मार्टफोन, वाचा फीचर्स अन् डिटेल्स सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो फोन जास्त काळ चालेल की नाही याचाही विचार करा. त्यामुळे मोबाईल घेताना त्याची मेमरी, RAM, प्रोसेसर तपासणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. तुम्ही या गोष्टी न तापसता फक्त महागडा किंवा फक्त चांगल्या कॅमेऱ्यासाठी जास्त पैसे गुंतवत असाल तर तुम्ही कदाचित चूक करत आहात. त्यामुळे नवीन मोबाईल घेताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
First published:

Tags: Digital prime time, Tech news, Technology

पुढील बातम्या