मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

तुमचा फोन नंबर कोणी ब्लॉक केला असेल तर कसे तपासायचे? स्टेप बाय स्टेप पाहा

तुमचा फोन नंबर कोणी ब्लॉक केला असेल तर कसे तपासायचे? स्टेप बाय स्टेप पाहा

एखाद्या व्यक्तीने तुमचा फोन नंबर ब्लॉक केला आहे, हे सोप्य स्टेपमध्ये समजून घ्या.

एखाद्या व्यक्तीने तुमचा फोन नंबर ब्लॉक केला आहे, हे सोप्य स्टेपमध्ये समजून घ्या.

एखाद्या व्यक्तीने तुमचा फोन नंबर ब्लॉक केला आहे, हे सोप्य स्टेपमध्ये समजून घ्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 5 ऑक्टोबर : आज कोणत्याही व्यक्तीशी कॉल किंवा मेसेजद्वारे सहज बोलता येते. आता तुम्हाला एखाद्या व्यक्तीशी बोलण्यासाठी आणि भेटण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागत नाही. तुम्ही फक्त एका कॉल किंवा टेक्स्टद्वारे कोणत्याही व्यक्तीची माहिती मिळवू शकता. पण जर कोणी तुम्हाला कोणत्याही कारणास्तव ब्लॉक केले तर? अर्थात ही अजिबात चांगली गोष्ट नाही. मात्र, तुम्हाला कोणीतरी ब्लॉक केले आहे हे कसे तपासायचे?

जेव्हा तुम्ही सतत एखाद्याला कॉल किंवा मेसेज करण्याचा प्रयत्न करत असता आणि तुम्हाला प्रतिसाद मिळत नाही, तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या ब्लॉक लिस्टमध्ये असू शकता. पण जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही ज्या व्यक्तीला कॉल करत आहात तो तुमचा खास मित्र किंवा जवळचा नातेवाईक आहे आणि तो तुम्हाला ब्लॉक करू शकत नाही, तर आता तुम्ही सहज शोधू शकता की त्याने तुम्हाला ब्लॉक केले आहे की नाही.

कोणीतरी तुम्हाला ब्लॉक केले आहे की नाही हे शोधण्याचा खात्रीशीर मार्ग नसला तरी, तुम्हाला ब्लॉक केले आहे की नाही हे सांगणारी एक सोपी युक्ती आहे. लक्षात ठेवा की अनेक वेळा तांत्रिक दोषांमुळे लोक संदेश किंवा कॉलला उत्तर देऊ शकत नाहीत.

वाचा - YouTube जाहिरातींमुळे हैराण आहात का? फक्त एक काम करा अन् नॉनस्टॉप आनंद घ्या

तुम्हाला कोणी ब्लॉक केले आहे हे कसे कळेल?

स्टेप 1- तुमच्या फोनचा डायलर उघडा आणि त्या व्यक्तीला कॉल करण्याचा प्रयत्न करा.

स्टेप 2: जर तुम्हाला एखादी रिंग ऐकू आली आणि लगेच 'व्यस्त' असल्याचे सांगितले तर तुम्हाला ब्लॉक केलेले असू शकते. तुम्ही खरोखरोच ब्लॉक आहात, याची खात्री करण्यासाठी तुम्ही 2-4 वेळा कॉल करण्याचा प्रयत्न करू शकता. पहिल्या कॉलमध्ये तुम्हाला एक रिंग ऐकू येईल. मात्र, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या वेळी तुम्ही थेट 'ज्या नंबरवर कॉल करत आहात तो व्यस्त आहे' अशी कोणतीही रिंग न वाजता ऐकू येईल.

स्टेप 3: प्रयत्न करा आणि त्या व्यक्तीला मॅसेज पाठवा, जर तो पाठवला गेला नाही किंवा तुम्हाला व्हॉइसमेल पाठवण्यास सांगितले तर तुम्हाला ब्लॉक केले असू शकते.

फक्त शक्यता

या सर्व फक्त शक्यता आहेत. तुम्ही खरोखरच ब्लॉक आहात, याची खात्री देत नाही. वास्तविक, अशी कोणतीही पद्धत नाही, की समोरच्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले असल्याचे स्पष्ट होईल. पण, जर प्रत्येकवेळी तुम्ही फोन केल्यानंतर व्यस्त सांगत असेल तर तुमचा नंबर ब्लॉक केलेला असू शकतो. कधीकधी नेटवर्क प्रोब्लेममुळे देखील अशा अडचणी येऊ शकतात.

First published:

Tags: Smartphone