नवी दिल्ली, 23 एप्रिल : आधार कार्ड
(Aadhaar Card) अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. हे सुरक्षित ठेवणं गरजेचं असून सध्या सर्वच गोष्टी आधार कार्डशी लिंक कराव्या लागतात. हे डॉक्युमेंट महत्त्वाचं असल्याने याच्या ऑनलाइन फ्रॉड
(Aadhaar Card Online Fraud), सायबर क्राइमच्या प्रकरणातही वाढ झाली आहे. एखाद्याचं आधार कार्ड दुसऱ्याने वापरल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. त्यामुळे आपल्या आधार कार्डचा कुठे चुकीचा गैरवापर तर होत नाही ना हे पाहणं गरजेचं आहे.
यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात UIDAI च्या अधिकृत साइटवर ऑनलाइन तुमचं आधार कार्ड कुठे, कधी वापरलं गेलं आहे, याची माहिती मिळवता येते. ही माहिती तुमच्याकडे कोणतीही फी चार्ज केल्याशिवाय फ्रीमध्ये पाहता येते.
आधार कार्ड कसं तपासाल?
- आधार कार्डची वेबसाइट uidai.gov.in वर क्लिक करा.
- Aadhaar Services खाली Aadhaar Authentication Histroy वर क्लिक करा.
- आता आधार नंबर आणि सिक्योरिटी कोड टाकून Send OTP वर क्लिक करा.
- रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर आलेला OTP टाकून सबमिट करा.
- त्यानंतर मागितलेली माहिती भरा.
- Verify OTP वर क्लिक केल्यानंतर एका लिस्टमध्ये संपूर्ण माहिती मिळेल.
अशाप्रकारे तुम्हाला मागील 6 महिन्यात तुमचं आधार कार्ड कुठे, कधी वापरलं गेलं याची माहिती मिळेल. जर मागील सहा महिन्यात केवळ तुमच्याकडून आधार कार्डचा वापर केला गेला नसेल, तर तक्रार दाखल करू शकता. टोल फ्री नंबर 1947 वर तक्रार नोंदवता येईल. ऑनलाइन तक्रार करण्यासाठी uidai.gov.in/file-complaint चा वापर करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.