नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : सरकारी तेल कंपन्यांनी 1 ऑगस्टपासून एलपीजी गॅस (LPG Gas Cylinder) सिलेंडरच्या नव्या किमती जारी केल्या आहेत. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी या किंमतीत बदल केले जातात. मात्र या महिन्यात 14.2 किलो असणाऱ्या विना सब्सिडी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आलेली नाही. तर इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने 19 किलोग्रॅम कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात 73.5 रुपये प्रति सिलेंडर दर वाढवला आहे. 19 किलोग्रॅम कमर्शियल सिलेंडरचा दर वाढून 1550 ते 1623 रुपये इतका झाला आहे.
घरगुती गॅस सिलेंडर किंमतीत वाढ झालेली नाही. या महिन्यात नवी वाढ न होता, आधीच्याच किंमती लागू आहेत. तुमच्या शहरात गॅस सिलेंडरचा दर काय आहे, हे जाणून देखील जाणून घेता येऊ शकतं.
सिलेंडरचा अधिकृत दर तपासण्यासाठी इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाईटवर चेक करता येईल. त्याशिवाय तुम्ही https://www.iocl.com/pages/indane-cooking-gas-overview यावरही सिलेंडरचा दर तपासू शकता. या लिंकवर नॉन-सब्सिडी आणि 19 किलोग्रॅमवाल्या सिलेंडरचे दोन ब्लॉक दिसतील. घरगुती गॅस सिलेंडरची किंमत पाहण्यासाठी खाली दिलेल्या सेक्शनमध्ये किंमत तपासण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करावं लागेल.
त्यानंतर राज्य, तालुका, डिस्ट्रिब्यूटर निवडावा लागेल. इथे ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सर्व सिलेंडरच्या किंमती तपासता येतील. ज्यात 5 किलो, 14 किंला, 150 किलोपर्यंतच्या सिलेंडरचे दर समजतील. तुमच्या शहराचं नाव निवडून सिलेंडरचा दर जाणून घेता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.