मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

'आधार'मध्ये दिलेला जुना मोबाइल नंबर बंद झालाय? जाणून घ्या नंबर अपडेट करण्याची सोपी पद्धत

'आधार'मध्ये दिलेला जुना मोबाइल नंबर बंद झालाय? जाणून घ्या नंबर अपडेट करण्याची सोपी पद्धत

Aadhar Card शी संबंधित सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डमध्ये योग्य मोबाइल नंबर असणं सर्वात महत्त्वाचं आहे.

Aadhar Card शी संबंधित सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डमध्ये योग्य मोबाइल नंबर असणं सर्वात महत्त्वाचं आहे.

Aadhar Card शी संबंधित सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डमध्ये योग्य मोबाइल नंबर असणं सर्वात महत्त्वाचं आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 18 मे : आधार कार्ड (Aadhaar Card) हे सध्या सर्व आवश्यक सुविधांसाठी एक महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे. सरकारी योजनेच्या सुविधा मिळणे किंवा प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासारख्या कामांसाठी आधारकार्ड आवश्यक आहे. आधारशी संबंधित सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डमध्ये योग्य मोबाइल नंबर असणे सर्वात महत्त्वाचे आहे.

आधार क्रमांकाच्या (Aadhaar Number) साहाय्याने कोणतेही काम करण्यासाठी त्याच्यावरील मोबाईल नंबरवर किंवा ईमेल आयडीवर पडताळणीसाठी OTP येतो. तुमचा मोबाईल क्रमांक बदलला असेल आणि आधीचा क्रमांक बंद असेल तरीही आधार पडताळणीसाठी येणारा ओटीपी तुमच्या जुन्या क्रमांकावर जाईल. म्हणजेच, तुम्हाला ओटीपी पडताळणीसह प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही. यासाठी आधार कार्डाशी जोडलेला आपला जुना मोबाईल क्रमांक बंद झाल्यास चालू असलेला क्रमांक अपडेट करणे आवश्यक ठरते.

आधारमध्ये नवीन क्रमांक कसा अपडेट करावा

>> प्रथम तुम्हाला आधार नोंदणी / अपडेट सेंटरवर जावे लागेल.

>> यानंतर आधार कार्ड दुरुस्ती अर्ज भरावा लागेल.

>> आपल्याला या फॉर्मवर अपडेट करायचा असलेला मोबाइल नंबर भरावा. त्यानंतर अर्ज सबमिट करा.

त्यानंतर आपल्याला प्रमाणीकरणासाठी आपली बायोमेट्रिक्स द्यावी लागतील.

>> यानंतर तेथील कार्यपालक तुम्हाला पावती (रीसीट) देईल.

>> या पावतीमध्ये तुम्हाला एक विनंती क्रमांक (रिक्वेस्ट नंबर - URN) मिळेल.

>> आपण URN वापरून आपली अपडेट स्थिती तपासू शकता. (म्हणजेच क्रमांक अपडेट झाला आहे किंवा नाही ते तपासू शकता.)

>>  मोबाईल नंबर आधारमध्ये अपडेट केल्यानंतर तुम्हाला नवीन आधारकार्ड घेण्याचीही गरज नाही.

>> जेव्हा आपला नवीन मोबाइल नंबर आधारवर नोंदणीकृत होईल, तेव्हा तुम्हाला त्याच बदललेल्या मोबाइल नंबरवर आधार पडताळणीसाठी ओटीपी मिळू लागेल.

>> तुम्हाला आधारची अद्ययावत स्थिती बघायची असेल तर यूआयडीएआयच्या (UIDAI) टोल-फ्री क्रमांकावर 1947 वर कॉल करूनही तुम्ही जाणून घेऊ शकता.

हे वाचा - पुन्हा बदलणार नियम! आता कोरोनातून बरं झालेल्यांना लसीकरणासाठी 9 महिने करावी लागणार प्रतीक्षा?

कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही

आधार कार्डावरील मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. फक्त आधार अपडेट अर्ज भरावा लागेल. यात सध्याचा चालू असलेला मोबाइल नंबर भरावा लागेल. तसेच, अपडेटसाठीचे शुल्क जमा करावे लागेल.

First published:

Tags: Aadhar card, Aadhar card link, Tech news