Home /News /technology /

स्मार्टफोनमध्ये 'अशी' निवडा पसंतीची भाषा; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

स्मार्टफोनमध्ये 'अशी' निवडा पसंतीची भाषा; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

सध्या स्मार्टफोन ( smartphones) अधिक मॉडर्न होत असून, हे सर्व नवीन तंत्रज्ञानामुळे (new technology) शक्य झालं आहे. अनेकदा कंपनीकडून स्मार्टफोनमध्ये अनेक सुविधा दिलेल्या असतात.पण आपल्या स्मार्टफोनमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत, हे कामाच्या व्यापात पाहण्याचं राहून जातं. स्मार्टफोनमध्ये स्वतःची मातृभाषा, पसंतीची भाषा असावी, अशीही अनेकांची इच्छा असते; पण भाषा (language) कशी बदलावी, याची माहिती अनेकांना नसते. परंतु चिंता करण्याची गरज नाही

पुढे वाचा ...
    मुंबई, 17 नोव्हेंबर-  सध्या स्मार्टफोन   ( smartphones)  अधिक मॉडर्न होत असून, हे सर्व नवीन तंत्रज्ञानामुळे  (new technology) शक्य झालं आहे. अनेकदा कंपनीकडून स्मार्टफोनमध्ये अनेक सुविधा दिलेल्या असतात.पण आपल्या स्मार्टफोनमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत, हे कामाच्या व्यापात पाहण्याचं राहून जातं. स्मार्टफोनमध्ये स्वतःची मातृभाषा, पसंतीची भाषा असावी, अशीही अनेकांची इच्छा असते; पण भाषा   (language)   कशी बदलावी, याची माहिती अनेकांना नसते. परंतु चिंता करण्याची गरज नाही. स्मार्टफोनमधली भाषा कशी बदलावी   (change the language)  याच्या काही सोप्या टिप्स तुम्हाला सांगणार आहोत. 'झी बिझनेस'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. देशातले बहुतांश नागरिक अँड्रॉइड (Android) स्मार्टफोन वापरतात. परंतु अनेकांना हे माहिती नाही, की कंपनीने फोनमध्ये भाषा बदलण्याचा पर्यायदेखील दिलेला असतो. भाषा कशी बदलायची, फोन आपल्या भाषेत कसा वापरू शकतो, याबाबत काही सोप्या स्टेप्स तुम्हाला सांगत आहोत. याद्वारे तुम्हाला भाषा बदलण्यात कधीही अडचण येणार नाही. - सर्वांत प्रथम तुमच्या मोबाइलच्या सेटिंगमध्ये जा. - सेटिंगमध्ये गेल्यानंतर तेथे सिस्टीम हा ऑप्शन निवडा. - सिस्टीममध्ये गेल्यानंतर तेथे तुम्हाला 'लॅंग्वेज अँड इनपुट' हा ऑप्शन दिसेल, तो निवडा. - 'लॅंग्वेज अँड इनपुट'मध्ये गेल्यानंतर तेथे 'लँग्वेज' हा ऑप्शन दिसेल. तो ऑप्शन निवडा. -'लँग्वेज'मध्ये जाऊन 'अॅड लँग्वेज' हा ऑप्शन निवडा. - त्यानंतर तुमच्या पसंतीची भाषा निवडा. - त्यानंतर तुमच्या स्मार्टफोनची भाषा बदलली जाईल. (हे वाचा:Hero Electric चा मोठा निर्णय; देशभर 1 लाख चार्जिंग स्टेशन्स उभारणार स्मार्टफोनची भाषा बदलण्यासाठी वरीलप्रमाणे काही सोप्या स्टेप्स करणं गरजेचं आहे. स्वतःच्या भाषेत एखादी गोष्ट समजण्यास खूप सोपी जातं. त्यामुळे स्मार्टफोनमध्ये तुमची मातृभाषा, पसंतीची भाषा हवी असल्यास तुम्ही ती अगदी काही मिनिटांमध्ये बदलू शकता. स्मार्टफोनचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कारण तो आता मूलभूत गरजेचा भाग झाला आहे. ग्रामीण भागामध्येही स्मार्टफोन वापरणाऱ्यांचं प्रमाण वाढत आहे. कोरोनाच्या काळात तर ऑनलाइन शिक्षणासाठी स्मार्टफोन हा विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार ठरला. केवळ एकमेकांसोबत संवाद साधण्यासाठी नव्हे, तर इतर विविध कामांसाठी स्मार्टफोन उपयोगी पडत आहे; पण भाषेमुळे काही जणांच्या वापरावर मर्यादा येतात. त्यामुळे भाषा बदलून फोनचा वापर करावा.
    First published:

    Tags: Smartphones, Technology

    पुढील बातम्या