मुंबई, 7 मार्च : अॅपल (Apple) 8 मार्च 22 रोजी पीक परफॉर्मन्स नावाचा एक स्प्रिंग इव्हेंट करणार आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी, क्युपर्टिनो-आधारित जायंट आणि परवडणारा iPhone, iPhone SE 3, नवीन iPad Air आणि Mac कॉम्प्युटर (Mac computers) लाँच करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, आता या स्प्रिंग इव्हेंटच्या आधी iPhone SE (2020) वर चांगल्या ऑफर उपलब्ध आहेत. हा फोन सध्या फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर 30,298 रुपयांना विकला जात आहे. त्यामुळे ज्यांना हा फोन घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. हा फोन फ्लिपकार्टवरून खरेदी करताना त्याची किंमत 16,000 रुपयांपेक्षा कमी करण्यासाठी एक्सचेंज आणि बँक ऑफरचा लाभ ग्राहक घेऊ शकतात. या ऑफर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
Flipkart वर iPhone SE च्या 64GB व्हेरिएंटची किंमत 30,298 रुपये आहे. याशिवाय युजर्स या फोनवर 14,800 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर घेऊ शकतात. त्यामुळे जर युजरकडे 14,800 रुपयांचा रिसेल स्मार्टफोन असेल, तर ते फ्लिपकार्टवर 15,498 रुपयांना iPhone SE (2020) खरेदी करू शकतात. iPhone SEचे (2020) खरेदी केल्यास iPhone SEवर (2020) पाच टक्के कॅशबॅक आणि Paytm वॉलेटद्वारे पैसे भरल्यास 50 रुपयांची सवलत देखील मिळवता येऊ शकते. त्यामुळे तुम्ही जर आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर या संधीचा लाभ घ्यायला विसरू नका.
iPhone SE (2020) ची काही वैशिष्ट्यं
iPhone SE हा फोन 2020 मध्ये परत लाँच करण्यात आला होता. हा फोन 4.7-इंच रेटिना HD IPS LCD डिस्प्लेसह येतो. हे Apple च्या A13 बायोनिक चिपद्वारे पॉवर्ड असून ते आयफोन 11 सीरिजला आणखी जबरदस्त बनवतं. iPhone SE (2020) मध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह (optical image stabilisation) एकच 12-मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 7-मेगापिक्सेल फ्रंट शूटर आहे. स्मार्टफोनमध्ये IP67 वॉटर आणि डस्ट प्रोटेक्शन (water and dust protection) देखील आहे.
अॅपल 8 मार्च रोजी त्याच्या पीक परफॉर्मन्स (Peak Performance) कार्यक्रमात इतर उत्पादनांसह iPhone SE 3 लाँच करेल अशी अपेक्षा आहे. iPhone SE 3 5G सपोर्टसह सारख्याच डिझाइनमध्ये येण्याची अपेक्षा आहे. तसेच हा Apple च्या नवीन A15 बायोनिक चिपसह येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Iphone, Smart phone