Home /News /technology /

Akshaya Tritiya 2022: Google Pay आणि Paytm वर घरबसल्या करा सोनं खरेदी, पाहा सोपी प्रोसेस

Akshaya Tritiya 2022: Google Pay आणि Paytm वर घरबसल्या करा सोनं खरेदी, पाहा सोपी प्रोसेस

तुम्ही स्मार्टफोनमधल्या Google Pay आणि Paytm सारख्या पेमेंट Apps द्वारे सोनं ऑनलाइन खरेदी करू शकता. हे पेमेंट्स Apps तुम्हाला डिजीटल सोनं खरेदीची सुविधा देतात.

    नवी दिल्ली, 3 मे : अक्षयतृतियाच्या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. तुम्हीही सोनं खरेदीचा विचार करत असाल तर तुम्ही घरबसल्याही खरेदी करू शकता. दिवाळी आणि धनत्रयोदशीशिवाय आजच्या अक्षयतृतियाच्या दिवशी लोक सोन्यात गुंतवणूक करतात. तुम्ही घरबसल्या सोनं ऑर्डर करू शकता. यासाठी कोणतंही वेगळं App घेण्याची गरज नाही. तुम्ही स्मार्टफोनमधल्या Google Pay आणि Paytm सारख्या पेमेंट Apps द्वारे सोनं ऑनलाइन खरेदी करू शकता. हे पेमेंट्स Apps तुम्हाला डिजीटल सोनं खरेदीची सुविधा देतात. काय आहे डिजीटल गोल्ड? Digital Gold ची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यात अगदी लहानसं सोनंही 1 रुपयासारख्या किंमतीत खरेदी करता येऊ शकतं. दुकानातून फिजीकल गोल्ड खरेदी करताना ग्राहकांना ग्रॅमचा ऑप्शन मिळतो. ग्रॅममध्ये खरेदी करणं सर्वांनाच शक्य होत नाही. परंतु डिजीटल गोल्डमध्ये अधिकाधिक लोक आपल्या बजेटनुसार गुंतवणूक करू शकतात. डिजीटल गोल्डची सुरक्षितताही फिजीकल गोल्डच्या तुलनेत अधिक असते. जोपर्यंत तुम्ही याची विक्री करत नाही, तोपर्यंत ते सुरक्षित आहे. पेटीएमवर खरेदी करा डिजिटल गोल्ड - Paytm App मध्ये होमपेजवर तुम्हाला सर्च बारमध्ये गोल्ड सर्च करावं लागेल. सर्च केल्यानंतर गोल्ड लिहिलेलं दिसेल आणि त्यासोबत एक आयकॉनही असेल. या आयकॉनवर टॅप करा. त्यानंतर पेटीएम गोल्ड पेजवर पोहोचाल. दोन प्रकारे खरेदी करता येईल गोल्ड - इथे गोल्ड खरेदीसाठीचे दर लिहिलेले दिसतील. या प्लॅटफॉर्मवर दोन प्रकारे सोनं खरेदी करता येईल. यात किंमत टाकून किती रुपयांचं सोनं खरेदी करायचं त्यानुसार सोनं खरेदी करता येईल. तसंच किंमतीच्याऐवजी सोन्याचं वजन टाकून त्या किंमतीचं सोनं खरेदी करता येईल. असं करा पेमेंट - किंमत किंवा वजनावरुन गोल्डची निवड केल्यानंतर पेमेंट करावं लागेल. जर तुमच्याकडे प्रोमो कोड असेल, तर पेमेंट करण्याआधी कोड अप्लाय करुन प्रोसेस करा. जेणेकरुन कॅशबॅक किंवा गोल्डबॅक मिळू शकेल. विना प्रोमोकोड पेमेंट केल्यास या बेनिफिटचा फायदा मिळणार नाही. Google Pay द्वारे अशी करा सोनं खरेदी - Google Pay वर कसं खरेदी कराल सोनं? - Google Pay वर जा आणि New वर क्लिक करा. - सर्च बारमध्ये Gold Locker टाइप करा आणि क्लिक करा. - आता Buy वर क्लिक करा. इथे टॅक्ससह सध्याचा बाजारभाव दिसेल. - जितकं सोनं खरेदी करायचं आहे, तितकी किंमत टाका. - आता चेक मार्क चिन्हावर क्लिक करा. - खाली आलेल्या विंडोमध्ये पेमेंट मेथेड सिलेक्ट करा आणि प्रोसीड टू पेवर क्लिक करा. - पेमेंट झाल्यानंतर काही वेळात लॉकरमध्ये तुमचं सोनं दिसू लागेल. Google Pay वर सोन्याची विक्री कशी कराल? - Google Pay ओपन करा आणि New वर टॅप करा. - सर्च बारमध्ये Gold Locker टाइप करुन क्लिक करा. - आता Sell वर टॅप करा. सध्याचा सोन्याचा भाव दिसू लागेल. - सोनं विक्री करताना टॅक्स लागत नाही. जितकं सोनं विकायचं आहे तितकं टाका. - आता चेक मार्कवर क्लिक करा. सोनं विक्री झाल्यानंतर Google Pay अकाउंटमध्ये पैसे दिसू लागतील. गोल्ड लॉकरमध्ये दिसेल सोनं - Google Pay ने दिलेल्या माहितीनुसार, याद्वारे ग्राहक आपल्या मोबाइल App द्वारे 99.99 टक्के शुद्ध 24 कॅरेट सोनं खरेदी करू शकतात. ग्राहकांना हे सोनं MMTC-PAMP कडून मिळेल. ग्राहकांचं सोनं MMTC-PAMP कडून चालवल्या जाणाऱ्या गोल्ड एक्युमुलेशन प्लॅन किंवा GAP मध्ये स्टोर ठेवलं जाईल. गुगल पेच्या गोल्ड लॉकरमध्ये हे खरेदी केलेलं सोनं दिसेल.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Google, Paytm

    पुढील बातम्या