• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • स्मार्टफोन सतत स्लो होतोय? केवळ या 3 Settings ने होईल सुपरफास्ट

स्मार्टफोन सतत स्लो होतोय? केवळ या 3 Settings ने होईल सुपरफास्ट

काही सोप्या गोष्टींनी तुमच्या जुन्या स्मार्टफोनचा स्पीड फास्ट करण्यात मदत होऊ शकते.

 • Share this:
  नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : स्मार्टफोन जुने होण्यासह ते अतिशय स्लो झाल्याची समस्याही येते. याचा अर्थ तुमचा फोन कामाचा राहिलेला नाही, असं होत नाही. तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन हटवून नवा फोन घेण्याचा विचार करत असाल, तर काही ट्रिक्सने तुमचा जुनाच स्मार्टफोन फास्ट करू शकता. नवा स्मार्टफोन घेण्याआधी या काही ट्रिक्स वापरुन पाहू शकता. काही सोप्या गोष्टींनी तुमच्या जुन्या स्मार्टफोनचा स्पीड फास्ट करण्यात मदत होऊ शकते. सिस्टम आणि अपडेट - सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनच्या सॉफ्टवेअर पॅकेजला अपडेट करा. अनेकदा अपडेट्समध्ये बग फिक्सशिवाय परफॉर्ममन्सही वाढवता येतो. स्मार्टफोन अपडेट करण्यासाठी सर्वात आधी Settings मध्ये जा. तिथे System Update मध्ये Donwload Updates वर जा. त्यानंतर अपडेट्स इन्स्टॉल करा. इथे तुमचा स्मार्टफोन कोणत्या अॅपच्या वापरादरम्यान सर्वात स्लो होतो त्याबाबत माहिती घ्या. ते App समजल्यानंतर सोप्या स्पेप्स फॉलो करा. - Google play store मध्ये जा. - Google play store मध्ये प्रोफाइल फोटोवर टॅप करा. - त्यानंतर manage apps and device वर टॅप करा. - इथे आउटडेटेड Apps बाबत मेसेज दिसेल. - त्यानंतर ते Apps अपडेट करा.

  तुमचा फोन Hack झालाय? फोनमध्ये Malware आहे की नाही असं ओळखा

  Unwanted Files - अनेकदा फोनमध्ये नको असलेल्या मीडिया फाइल्स आणि शॉर्ट रील्स फाइल्स असतात. ते रिमूव्ह करा. त्याशिवाय स्मार्टफोनमधून वापरात नसलेले Apps हटवा. त्यासाठी Settings > Storage > Manage Storage मध्ये जा. इथे Delete Unused Apps ऑप्शन दिसेल. ते सिलेक्ट करा आणि डिलीट करा.

  केवळ 1 मेसेज आणि कायमची बंद होईल Corona Caller Tune, अशी करा सोपी प्रोसेस

  त्याशिवाय स्मार्टफोनला Factory Reset ही करू शकता. यामुळे स्मार्टफोन फास्ट होईल. परंतु हे करताना महत्त्वाचे Apps, डेटाचा बॅकअप आवश्यक घ्या.
  Published by:Karishma
  First published: