Home /News /technology /

सततच्या नको असलेल्या कॉल्सचा वैताग आला? फोन Flight Mode वर न टाकता अशी होईल Call पासून सुटका, पाहा सोपी ट्रिक

सततच्या नको असलेल्या कॉल्सचा वैताग आला? फोन Flight Mode वर न टाकता अशी होईल Call पासून सुटका, पाहा सोपी ट्रिक

काही सोप्या टिप्सने तुम्ही फोन फ्लाईट मोडवर (Flight Mode) न टाकताच इनकमिंग कॉल रोखू शकता. यासाठी तीन पद्धती वापरता येऊ शकतात.

  नवी दिल्ली, 26 जुलै : अनेकदा एखादं महत्त्वाचं काम करताना, एखाद्या मीटिंगमध्ये असताना नको असलेले कॉल (Unknown Calls) आल्याने डिस्टर्ब होतं. त्यामुळे कामावरचं लक्षही हटवलं जातं. अनेकदा स्पॅम कॉल (Spam calls), कधी कंपन्यांचे कॉल त्रासदायक ठरतात. स्पॅम कॉल्स कंट्रोल करण्यासाठी सर्व टेलिकॉम ऑपरेटर्स आणि थर्ड पार्टी अ‍ॅप्स प्रयत्न करत आहेत, तरीही स्पॅम कॉल अनेकदा येतात. परंतु काही सोप्या टिप्सने तुम्ही फोन फ्लाईट मोडवर (Flight Mode) न टाकताच इनकमिंग कॉल रोखू शकता. यासाठी तीन पद्धती वापरता येऊ शकतात. - सर्वात आधी आपल्या फोनच्या कॉल सेटिंग (Call Setting) ऑप्शनवर जा. त्यानंतर कॉल फॉरवर्डिंग पर्यायावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर तीन पर्याय दिसतील. Always Forward, Forward When Busy आणि Forward When Unanswered असे पर्याय दिसतील. त्यानंतर Always Forward पर्याय सिलेक्ट करा आणि असा नंबर टाका जो बंद असेल किंवा वापरात नसेल. त्यानंतर Enable वर क्लिक करा. आता तुमच्या नंबरवर येणारे सर्व कॉल बंद होतील. तसंच यामुळे युजर कोणत्याही समस्येशिवाय मोबाईल डेटाचाही वापर करू शकेल.

  (वाचा - Missed Call आणि WhatsApp द्वारे बुक करा LPG Gas Cylinder, जाणून घ्या सोपी पद्धत)

  - त्याशिवाय Call Barring पद्धतीचाही वापर करता येऊ शकतो. फोनच्या कॉल सेटिंगवर जा. कॉल सेटिंगमध्ये अ‍ॅडव्हान्स सेटिंगचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर Call Barring चा पर्याय दिसेल. आता all Incoming calls पर्यायावर क्लिक करा आणि Call Barring पासवर्ड टाका. हा पासवर्ड अधिकतर 0000 किंवा 1234 असतो. आता टर्न ऑनवर क्लिक करा.

  (वाचा - तुमचं बँक अकाउंट Aadhaar नंबरने हॅक होऊ शकतं का? UIDAI ने दिलं उत्तर)

  - त्याशिवाय Do Not Disturb चाही वापर करू शकता. स्मार्टफोन सेटिंगमध्ये साउंडवर टॅप करा, Do Not Disturb चा पर्याय निवडा आणि कॉलवर क्लिक करा. एकदा कॉलवर टॅप केल्यानंतर पॉपअप मेन्यूमध्ये Do not Allow Any Calls वर क्लिक करा. आता allow repeat Callers लाही ऑफ करा.
  Published by:Karishma
  First published:

  पुढील बातम्या