मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Google Chrome वर सततचे नोटिफिकेशन त्रासदायक ठरतात? असं करा ब्लॉक, पाहा सोपी ट्रिक

Google Chrome वर सततचे नोटिफिकेशन त्रासदायक ठरतात? असं करा ब्लॉक, पाहा सोपी ट्रिक

सततचे नोटिफिकेशन काम करताना त्रासदायक ठरू शकतात. जर तुम्हालाही ही नोटिफिकेशनची समस्या नको असेल, तर गुगल क्रोमवर येणारे नोटिफिकेशन ब्लॉक (Block Notification)  करण्याचा पर्याय आहे.

नवी दिल्ली, 9 जुलै : वेब ब्राउजर गुगल क्रोमचा (Google Chrome) वापर सर्वच लहान-मोठ्या कामांसाठी केला जातो. अनेक जण सर्च करण्यासाठी अधितर गुगल क्रोमचं ओपन करतात. गुगल नोटिफिकेशनमुळे (Google Notification) नवे आर्टिकल वेळोवेळी मिळत असतात. परंतु सततचे नोटिफिकेशन काम करताना त्रासदायक ठरू शकतात. जर तुम्हालाही ही नोटिफिकेशनची समस्या नको असेल, तर गुगल क्रोमवर येणारे नोटिफिकेशन ब्लॉक (Block Notification)  करण्याचा पर्याय आहे.

काय आहे गुगल क्रोम नोटिफिकेशन -

युजर्सच्या लॅपटॉप, कंप्युटर, स्मार्टफोनमध्ये पॉपअपद्वारा वेबसाईटच्या आर्टिकलची लिंक पाठवली जाते. ज्यावेळी युजर्स एखाद्या वेबसाईटमध्ये पहिल्यांदा व्हिजिट करतात, त्यावेळी वेबसाईटच्या नोटिफिकेशनमध्ये विचारलं जातं, की जर युजर अ‍ॅग्री असेल, तर वेबसाईटमध्ये जेव्हा कधी कोणतं आर्टिकल येईल, त्यावेळी नोटिफिकेशन पाठवलं जाईल.

कोणीच पाहू शकत नाही तुमची Google Search History, करा हे एकच काम

असं करा नोटिफिकेशन बंद -

- कंप्युटर किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम ओपन करा.

- सर्वात वर उजव्या बाजूला सेटिंगचा पर्याय दिसेल, तो ओपन करा.

- आता प्रायव्हसी आणि सिक्योरिटीमध्ये जा. त्यानंतर साईट सेटिंग्सवर जा.

- त्यानंतर बाजूला दिसणाऱ्या नोटिफिकेशनला टर्न ऑफ करा. यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळणं बंद होईल.

तुमचा Smartphone स्लो झालाय? WhatsApp च्या या दोन ट्रिक फॉलो कराच

दरम्यान, नवे आयटी मंत्री अश्विनी वैष्णव (IT Minster Ashwini Vaishnav) यांनी गुरुवारी या खात्याचा पदभार स्वीकारला. हा पदभार स्वीकारताच त्यांनी सोशल मीडिया (Social Media) कंपन्यांना त्यांच्या मनमानी कारभाराबद्दल इशारा दिला आहे. 'देशाचा कायदा हा सर्वोच्च आहे. ट्विटरनं (Twitter) या कायद्याचं पालन केलं पाहिजे,' असा इशारा वैष्णव यांनी दिला आहे.

First published:
top videos

    Tags: Google, Tech news