मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Unwanted calls मुळे वैताग आलाय? अशी करा सुटका

Unwanted calls मुळे वैताग आलाय? अशी करा सुटका

Unwanted calls कॉलपासून सुटका करुन घेण्यासाठी ते ब्लॉक करणं एक चांगला पर्याय आहे. त्याशिवाय DND (Do Not Disturbe) ऑप्शनचाही वापर करू शकता.

Unwanted calls कॉलपासून सुटका करुन घेण्यासाठी ते ब्लॉक करणं एक चांगला पर्याय आहे. त्याशिवाय DND (Do Not Disturbe) ऑप्शनचाही वापर करू शकता.

Unwanted calls कॉलपासून सुटका करुन घेण्यासाठी ते ब्लॉक करणं एक चांगला पर्याय आहे. त्याशिवाय DND (Do Not Disturbe) ऑप्शनचाही वापर करू शकता.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 29 मे : अनेक जण कधीही येणाऱ्या आणि नको असेलल्या (Unwanted calls) कॉलमुळे वैतागलेले असतात. एखाद्या महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असताना, झोपलेलं असताना किंवा ड्रायव्हिंग करताना अशा वेळीच नेमके, नको असलेले कॉल येतात. काही-काही वेळाच्या अंतराने येणारे हे कॉल अतिशय त्रासदायकही ठरतात. कधी TrueCaller मुळे हे कॉल टेलिमार्केटिंगचे आहेत हे समजतं, परंतु कधी हे समजत नाही. त्यामुळे अशा कॉलपासून सुटका करुन घेण्यासाठी ते ब्लॉक करणं एक चांगला पर्याय आहे. त्याशिवाय DND (Do Not Disturbe) ऑप्शनचाही वापर करू शकता.

कसं कराल ब्लॉक -

- तुमच्या डिव्हाईसवर फोन अ‍ॅप्लिकेशन ओपन करा.

- त्यानंतर सेटिंगमध्ये कॉलर आयडी आणि स्पॅमवर टॅप करा.

- कॉलर आयडी आणि स्पॅमची सुविधा चालू किंवा बंद करा.

- स्पॅम कॉल आल्यास, फोनची रिंग वाजण्यापासून रोखण्यासाठी, स्पॅम कॉल फिल्टर सुविधा सुरू करा.

- असे कॉल आल्यास, तुम्हाला कोणताही मिस्ड कॉल किंवा वॉईसकॉलची सूचना मिळणार नाही. मात्र तुम्ही कॉल हिस्ट्रीमध्ये, फिल्टर केलेले कॉल पाहू शकता.

नंबर बंद करायचा असल्यास -

- कॉलची ओळख स्पॅम कॉल म्हणून करा.

- फोनवर आलेल्या कॉलवर त्वरित जा.

- त्यानंतर स्पॅम रिपोर्ट करा, इथे तुम्ही हा नंबर बंद करू इच्छिता का असं प्रश्न विचारला जाईल.

- आलेला कॉल, स्पॅम कॉल म्हणून रिपोर्ट करून नंबर बंद करण्यासाठी त्यावर टॅप करा.

(वाचा - Paytm मधून चुकून दुसऱ्यालाच पैसे झाले ट्रान्सफर? जाणून घ्या कसे मिळवाल परत)

DND अ‍ॅक्टिव्ह करा -

- सर्वात आधी मेसेजिंग अ‍ॅपवर जा.

- इथे START 0 टाईप करुन 1909 वर सेंड करा. त्यानंतर नको असलेल्या स्पॅम कॉलपासून सुटका होईल.

(वाचा - कोणी दुसरा व्यक्ती तुमच्या Aadhaar Card चा वापर तर करत नाही ना? असं ओळखा)

कॉलद्वारे ब्लॉक करा -

- स्पॅम कॉल ब्लॉक करण्यासाठी आपल्या फोनवरुन 1909 वर कॉल करा.

- फोनवर माहिती दिली जाईल, त्याचं पालन करा.

- DND अ‍ॅक्टिव्ह करा.

First published: