Home /News /technology /

Dos and Don't : सायबर फ्रॉडपासून वाचण्यासाठी SBI ने ग्राहकांना सांगितला मार्ग

Dos and Don't : सायबर फ्रॉडपासून वाचण्यासाठी SBI ने ग्राहकांना सांगितला मार्ग

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ग्राहकांना जागरुक आणि सावध राहण्याचं सांगितलं आहे. तसंच नेट बँकिंगचा वापर करताना काही टिप्सही दिल्या आहेत.

  नवी दिल्ली, 16 जून : देशात सायबर फ्रॉडच्या (Cyber Fraud) संख्येत मोठी वाढ झाली आहे. कोरोना काळात अनेकांकडून ऑनलाईन व्यवहारांत वाढ झाली आहे. नेट बँकिंगमध्ये झालेल्या वाढीचा फायदा फ्रॉडस्टर्सकरुन घेण्यात येत आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ग्राहकांना जागरुक आणि सावध राहण्याचं सांगितलं आहे. तसंच नेट बँकिंगचा वापर करताना काही टिप्सही दिल्या आहेत. - इंटरनेट बँकिंग पासवर्ड वेळोवेळी बदलत राहा. नेहमी लास्ट लॉगइन डेट आणि वेळ तपासा. - जर SBI च्या वेबसाईटवर जायचं असेल, तर कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. ब्राउजरच्या अॅड्रेस बारमध्ये https://onlinesbi.com टाईप करा. - पब्लिक वायफाय, फ्री वायफाय, सायबर कॅफे आणि इतरांशी शेअर होणाऱ्या पीसीवरुन इंटरनेट बँकिंगचा वापर करू नका. - खासगी माहिती बँक साईटवर अपडेट केल्यावर रिवॉर्ड देण्याचा दावा करणाऱ्या ईमेल, एसएमएस आणि फोन कॉलपासून सावध राहा. - कोणत्याही व्यक्तीच्या बोलण्यावरुन अॅप डाउनलोड करू नका. बँक साईटवर जाण्यासाठी कधीही मेल किंवा मेसेज बॉक्समध्ये आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.

  (वाचा - विद्यार्थ्याने Instagram मध्ये सांगितली मोठी त्रुटी,Facebookने दिले 22 लाख रुपये)

  या नंबरवर करता येईल तक्रार - भारत सरकारने इंटरनेट बँकिंगसह ऑनलाईन फायनान्ससंबंधीत फसवणुकीची तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर 155260 जारी केला आहे.

  (वाचा - ऑफिस सुरू करण्यासाठी कंपन्या तयार?वाचा सर्व्हेनुसार काय आहे कर्मचाऱ्यांचं म्हणणं)

  ऑनलाईन फसवणूक झाल्यानंतर पीडित व्यक्ती पोलीस अधिकाऱ्यांकडून मॅनेज होणाऱ्या हेल्पलाईनवर कॉल करावा लागेल. जर फ्रॉड झाल्यापासून 24 तास झाले असतील, तर पीडित नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार दाखल करू शकतात.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Cyber crime, Online fraud, SBI, Tech news

  पुढील बातम्या