मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Wireless Charging ने हवेत कसा चार्ज होतो Smartphone? वाचा डिटेल्स

Wireless Charging ने हवेत कसा चार्ज होतो Smartphone? वाचा डिटेल्स

आता तुमचा फोन हा वायरलेस चार्जर (Wireless Charger) वापरून थेट हवेतूनच (Air) चार्ज करण्याची सुविधा आली आहे.

आता तुमचा फोन हा वायरलेस चार्जर (Wireless Charger) वापरून थेट हवेतूनच (Air) चार्ज करण्याची सुविधा आली आहे.

आता तुमचा फोन हा वायरलेस चार्जर (Wireless Charger) वापरून थेट हवेतूनच (Air) चार्ज करण्याची सुविधा आली आहे.

  नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी : मोबाईल (Mobile) कितीही चांगला असला, तरी त्याला चार्जिंग (Charging) करावंच लागतं. नेमकं कामाच्या (Work) वेळी मोबाईलचं चार्जिंग संपलं, तर अनेकदा चिडचिड सुद्धा होते. चार्जिंग करताना तो मोबाईल चार्जिंग केबल लावून एका ठिकाणी ठेऊन द्यावा लागतो. त्यासाठी चार्जिंग केबल्स (Charging Cables) सांभाळणं हा आणखी एक त्रास. पण आता तुमचा फोन हा वायरलेस चार्जर (Wireless Charger) वापरून थेट हवेतूनच (Air) चार्ज करण्याची सुविधा आली आहे. अर्थात यासाठी वापरण्यात येणाऱ्या वायरलेस चार्जरचा तुमच्या मोबाईलवर नेमका काय परिणाम होतो? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

  वायरलेस चार्जिंगचा ट्रेंड वाढत आहे. युजर प्रीमियम फोनसह वायरलेस चार्जिंगचा वापर करत आहेत. परंतु अनेक युजर्सला असं वाटतं की, याचा डिव्हाइसवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हे वायरलेस चार्जिंग तंत्रज्ञान कसं कार्य करतं, आणि डिव्हाइसवर त्याचा वाईट परिणाम होतो की नाही, याची माहिती जाणून घेणं महत्त्वाचं आहे. यासाठी सर्वात प्रथम वायरलेस चार्जिंग कसं काम करतं, ते समजून घ्या.

  गॅजेट्स नाऊच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, वायरलेस चार्जिंगमध्ये मोबाइल चार्ज करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या तत्रंज्ञानाचाचा वापर केला जातो, ज्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन निर्माण करणारं डिव्हाइस हवेत इलेक्ट्रिक कंपनं सोडतं, ज्यामुळे फोन चार्ज होतो. पण या प्रकारच्या चार्जिंगसाठी तुमचा फोन वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करणं गरजेचं आहे.

  हे वाचा - भारत सरकारकडून पुन्हा 50 Chinese Apps बॅन? पाहा डिटेल्स

  तर, फोन खराब होऊ शकतो -

  तज्ज्ञांच्या मते, वायरलेस चार्जिंग खूप फायद्याचं आहे. परंतु, ते वायर चार्जरपेक्षा कमी प्रभावी आहे. त्याला काम करण्यासाठी अधिक पॉवरची आवश्यकता असते. एका संशोधनानुसार वायरलेस चार्जिंग वायर चार्जरपेक्षा 47 टक्के जास्त पॉवर वापरतं. वायर चार्जर लावून फोन चार्ज करताना फोन सहसा जास्त गरम होत नाही. त्या तुलनेत वायरलेस चार्जिंगवेळी फोन जास्त गरम होतो. काही फोन ही उष्णता सहन करू शकतात, परंतु काही फोन ही उष्णता सहन करण्यास सक्षम नसतात. जर युजर्सने याची काळजी घेतली नाही, तर फोन खराब होऊ शकतो.

  फोनचं चार्जिंग कसं होतं?

  वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करणाऱ्या स्मार्टफोनमध्ये कॉपर कॉइल्स असतात. वायरलेस चार्जरमध्ये वापरण्यात येणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन चालू असताना ते स्वतःभोवती एक चुंबकीय क्षेत्र तयार करतं. ते स्मार्टफोनच्या कॉपर कॉइल्सला जोडलं जातं. या चुंबकीय क्षेत्रातून विद्युत ऊर्जा निर्माण होते, आणि फोनची बॅटरी चार्ज करते.

  हवेतून ऊर्जा घेऊन फोन चार्जिंग करण्याचा पर्याय आल्यामुळे आता याचा युजर्सला चांगला फायदा होऊ शकतो. पण असा चार्जर खरेदी करताना तो चांगल्या कंपनीचा व दर्जेदार घेणं केव्हाही चांगलं.

  First published:

  Tags: Smartphone, Tech news