किती सुरक्षित आहे तुमची Renault Kwid कार ? पहा हा VIDEO

किती सुरक्षित आहे तुमची Renault Kwid कार ? पहा हा VIDEO

दक्षिण-पूर्व आशियाई देशांसाठी न्यू कार अॅसेसमेंट प्रोग्राम(एनसीएपी)मध्ये लाँच करण्यात आलेली रेनो क्विडची सुरक्षेच्या दृष्टीने चाचणी करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 12 जुलै : दक्षिण-पूर्व आशियाई देशांसाठी न्यू कार अॅसेसमेंट प्रोग्राम(एनसीएपी)मध्ये लाँच करण्यात आलेली रेनो क्विडची सुरक्षेच्या दृष्टीने चाचणी करण्यात आली आहे. आणि या परीक्षेत रेनो क्विडला शुन्य स्टार देण्यात आले आहेत. आसियान एनसीएपीने तिसऱ्या तिमाहीत रेनो क्विडचं मूल्यांकन केलं, ज्यामध्ये तिला एकूण 24.68 गुण मिळाले आहेत. या चाचणीत क्विडला एओपी श्रेणीमध्ये (AOP category) 10.24 गुण मिळाले, तर सीओपी श्रेणीमध्ये (COP category) त्याने 14.56 गुण मिळाले आहेत. या मॉडेलमध्ये कोणतीही सेफ टेक्नॉलॉजी नसल्यामुळे तिला (SAT category) श्रेणीत शुन्य गुण मिळाले आहेत.

VIDEO : जखमी तरुणांची जगण्यासाठी याचना पण लोकं सेल्फी काढत होते !

या कारमध्ये कार चालकासाठी एअर बॅग देण्यात आली आहे. पण कारमध्ये लहान मुलांच्या सुरक्षेसाठी कोणतेही फिचर देण्यात आलेले नाही. तीन क्षेण्यांमध्ये चाचण्या केल्यानंतर अॅसेसमेंट प्रोग्रामकडून या कारसाठी शुन्य गुण देण्यात आले आहेत. अॅसेसमेंट प्रोग्रामचे जनरल सचिव डॉ. खैरिल अनवर अबु कासिम यामनी या चाचणीवर नाराजी व्यक्त केली आहे.

आताच्या काळातही सुरक्षा नसलेल्या गाड्या बाजार आहेत यावर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. आणि त्यातूनही गंभीर म्हणजे या गाड्यांची विक्री अशा शहरात होते जिथे रस्ते अपघाताची संख्या जास्त आहे.

त्यामुळे तुम्ही जर रेनो क्विड कार घेण्याच्या तयारीत असाल तर त्याच्या सुरक्षेबद्दल माहिती नक्की जाणूव घ्या.

हेही वाचा...

VIDEO : पुणे तिथे काय उणे,अख्खा बंगला जॅक लावून 4 फूट उचलला

पोलिसांनी साजरा केला 3 मुलींच्या बलात्काराचा आनंद, गावाला मटनाची दावत

माणुसकीला काळिमा, ओळखीच्याच इसमाने साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर केला लैंगिक अत्याचार

First published: July 12, 2018, 8:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading