मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /मोबाइल रिचार्ज करुन दुकानदारांना पैसे कसे मिळतात?

मोबाइल रिचार्ज करुन दुकानदारांना पैसे कसे मिळतात?

तुम्हीही कधी तरी दुकानात जाऊन मोबाइलचं रिचार्ज केलं असेल. दुकानात रिचार्ज केल्यानंतर आपण दुकानदाराला रिचार्जच्या रकमेएवढेच पैसे देतो आणि तेवढ्याचं पैशांचं आपल्या मोबाइल अकाउंटवर रिचार्ज होतं. मग दुकानदार मोबाइल रिचार्ज करून पैसे कमवतात कसे, हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल.

पुढे वाचा ...

    मुंबई, 3 डिसेंबर : सध्याचं युग डिजीटल युग आहे. या डिजीटल युगात स्मार्टफोनच्या माध्यमातून चुटकीसरशी अनेक कामं ऑनलाईनच होतात. डिजीटल व्यवहारांचं प्रमाण वाढलं आहे. ऑनलाईन व्यवहार करणं सोपं आणि जलद झालं आहे. अनेकजण मोबाईल आणि DTH रिचार्ज, पाणी आणि वीज बिल भरणं, गॅस सिलिंडर बुकिंग ही कामं ऑनलाईनच करतात. पण आजही अनेक जण असे आहेत, की जे दुकानावर जाऊन आपल्या मोबाइलचं रिचार्ज (Mobile Recharge) करतात. तुम्हीही कधी तरी दुकानात जाऊन मोबाइलचं रिचार्ज केलं असेल. दुकानात रिचार्ज केल्यानंतर आपण दुकानदाराला रिचार्जच्या रकमेएवढेच पैसे देतो आणि तेवढ्याचं पैशांचं आपल्या मोबाइल अकाउंटवर रिचार्ज होतं. मग दुकानदार मोबाइल रिचार्ज करून पैसे कमवतात कसे, हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. त्याबद्दल जाणून घेऊया. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे.

    रिचार्जचं काम करणारे दुकानदार कंपनीकडून व्यावसायिक सिमकार्ड (commercial sim) घेतात. रिचार्जसाठी (Recharge) आलेल्या ग्राहकांच्या मोबाइलवर त्या संबंधित कंपनीच्या वतीने रिचार्ज करतात. यातून त्यांना कंपनीकडून कमिशन मिळते. हे कमिशन कमी असून यातून फक्त 3 टक्क्यांपर्यंत फायदा होतो, असं दुकानदारांचं म्हणणं आहे. जेव्हा ते तुमच्या मोबाईलवर 100 रुपयांचं रिचार्ज करतात, तेव्हा त्यांच्या खात्यातून 97 रुपये खर्च होतात. म्हणजेच त्यांना तीन रुपये मिळतात.

    हेही वाचा : Living Robot | आता जिवंत रोबोट मुलं जन्माला घालणार? अमेरिकेत प्रयोग

    प्रत्येक टेलिकॉम कंपनीचं स्वतःचं मोबाइल अॅप आहे. त्यातून रिचार्ज केलं जातं. यासाठी दुकानदाराला अॅपवर नोंदणी करावी लागते. त्यानंतर दुकानदाराला रिचार्ज करण्याची परवानगी दिली जाते. प्रत्येक रिचार्जवर त्यांना 2.5 ते 3 टक्के फायदा होतो. अलीकडच्या काळात रिचार्जसाठी वेगवेगळी डिजीटल पेमेंट अॅप्स आल्याने दुकानदाराकडून रिचार्ज करून घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. दुकानात जाऊन रिचार्ज करण्यासाठी कुणाकडे वेळ नाही आणि त्याची गरजही अनेकांना भासत नाही. टेक-सॅव्ही नसलेली मंडळी, वयस्कर मंडळी आदी मोजकेच ग्राहक रिचार्ज करण्यासाठी दुकानात जाताना दिसतात.

    काही वर्षांपूर्वी मोबाइल कंपन्या रिचार्ज कुपनची विक्री करत असत. रिचार्ज कुपनवर एक कोड असायचा. कार्ड स्क्रॅच केल्यावर तो कोड दिसत असे. त्याद्वारे ग्राहक रिचार्ज करायचे. ही कुपन्स कंपनी दुकानदाराला एमआरपीपेक्षा कमी दराने विकत असे. दुकानदार ते ग्राहकांना एमआरपीला विकायचे. यातून दुकानदाराला नफा व्हायचा; मात्र रिचार्ज करण्याची ही पद्धत आता कालबाह्य झाली आहे. आता रिचार्ज करण्यासाठी केवळ ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जातो.

    First published: