• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • तुमच्या Aadhaar कार्डवर किती SIM आहेत? या पोर्टलवरुन मिळेल माहिती, जाणून घ्या प्रोसेस

तुमच्या Aadhaar कार्डवर किती SIM आहेत? या पोर्टलवरुन मिळेल माहिती, जाणून घ्या प्रोसेस

TAFCOP पोर्टलचा वापर केला जाऊ शकतो. या पोर्टलद्वारे एका Aadhaar कार्डवर किती सिम जारी करण्यात आले, हे पाहता येऊ शकतं.

 • Share this:
  नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : काही दिवसांपूर्वी डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्सने (DoT) एक वेबपोर्टल लाँच केलं होतं. याद्वारे युजर्स त्यांच्या नावे किती मोबाइल कनेक्शन देण्यात आले हे पाहू शकतात. त्यासाठी TAFCOP पोर्टलचा वापर केला जाऊ शकतो. या पोर्टलद्वारे एका Aadhaar कार्डवर किती सिम जारी करण्यात आले, हेदेखील पाहता येऊ शकतं. DoT गाइडलाइन्सनुसार, एका आधार कार्डवरुन 9 मोबाइल कनेक्शन देता येऊ शकतात. एखादा चुकीचा नंबर Aadhaar कार्डने दिला गेला असेल, तर तो बंद करता येऊ शकतो. यासाठी पोर्टलच्या मदतीने रिक्वस्ट पाठवता येते.

  तुमच्या नावावर दुसरं कोणी सिमकार्ड वापरतंय का? असं ओळखा

  - तुमच्या Aadhaar ने किती सिम जारी झाले हे तपासण्यासाठी सर्वात आधी TAFCOP वेबसाईटवर जावं लागेल. - TAFCOP वेबसाईट https://tafcop.dgtelecom.gov.in वर अॅक्सेस करता येईल. - वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथे मोबाईल नंबर द्यावा लागेल. त्यानंतर OTP साठी रिक्वेस्ट करावी लागेल. - DoT कडून एक OTP मेसेज येईल. इथे तुम्ही तुमचं साइन-इन वॅलिडेट करू शकता. वॅलिडेट झाल्यानंतर Aadhaar कार्डशी लिंक असलेल्या सर्व मोबाईल नंबरची लिस्ट पोर्टलवर दिसेल. - जो नंबर वापरात नाही, तो बंद करण्याची रिक्वेस्ट इथे करता येईल. ही सर्विस सध्या तेलंगाना आणि आंध्र प्रदेश राज्यांसाठी आहे. येणाऱ्या काही दिवसांत इतर राज्यातही ही सुविधा सुरू केली जाणार आहे.

  स्मार्टफोन सतत स्लो होतोय? केवळ या 3 Settings ने होईल सुपरफास्ट

  दरम्यान, Smartphone चोरी झाल्यास, सरकारी पोर्टलच्या मदतीने तो ब्लॉक करता येऊ शकतो. सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टरच्या वेबसाईटवर ceir.gov.in हे काम करता येईल. CEIR कडे देशातील प्रत्येक मोबाईल फोनचा डेटा फोन मॉडेल, सिम, IMEI नंबर उपलब्ध असतो, ज्याच्या मदतीने चोरी झालेला फोन शोधता येऊ शकतो. यामुळे फोन ब्लॉक किंवा अनब्लॉक करता येऊ शकतो.
  Published by:Karishma
  First published: