Home /News /technology /

Location off केलं तरी Facebook असं शोधून काढतं तुमचं लोकेशन!

Location off केलं तरी Facebook असं शोधून काढतं तुमचं लोकेशन!

फेसबुकमुळे प्रायव्हसी जाते अशी तक्रार अनेक जण करतात पण लोकेशन दाखवणारा मोड स्विच ऑफ केला तरीही फेसबुकला तुमचं लोकेशन कळतंच. हा खुलासा खुद्द फेसबुकनेच केला आहे.

    मुंबई, 19 डिसेंबर : तुम्ही एखाद्या ठिकाणी निघालात किंवा एखाद्या ठिकाणी असलात तर फेसबुकवर पोस्ट करता. कधीकधी तुम्ही एखाद्या एअरपोर्टवर किंवा फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये असाल तर तुमच्या फेसबुकवर तुमचं लोकेशन अपडेट होतं. हे कसं काय होतं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण आता फेसबुकनेच याचं उत्तर दिलं आहे. फेसबुकमुळे प्रायव्हसी जाते अशी तक्रार अनेक जण करतात पण लोकेशन दाखवणारा मोड स्विच ऑफ केला तरीही फेसबुकला तुमचं लोकेशन कळतंच. हा खुलासा खुद्द फेसबुकनेच केला आहे. अमेरिकेतल्या दोन सिनेटर्सनी लिहिलेल्या पत्राला उत्तर देताना फेसबुकने म्हटलं आहे, युजर्सचं लोकेशन समजण्यासाठी फेसबुककडे तीन स्तरांवरची यंत्रणा आहे. फेसबुकच्या 3 यंत्रणा फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकच्या युजर्सची पसंती लक्षात घेऊन जाहिराती दिल्या जातात. त्यावर फेसबुकचं उत्पन्न अवलंबून आहे. त्यामुळे युजरचं लोकेशन कळणं महत्त्वाचं असतं. पहिली पद्धत म्हणजे जे युजर त्यांचा लोकेशन मोड ऑन ठेवतात त्यांचं लोकेशन फेसबुकला कळतं. जे लोकेशन मोड स्विच ऑफ करतात त्यांच्या पोस्टमधून ते नेमके कुठे आहेत याचा ठावठिकाणा शोधून काढता येतो. ही आहे दुसरी पद्धत. आणि तिसऱ्या पद्धतीत डिव्हाइसच्या IP अॅड्रेसवरूनही युजरचं लोकेशन कळू शकतं. (हेही वाचा : तुम्ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलंय का? या कारणासाठी करावंच लागेल हे काम) फेसबुकने सिनेटर्सच्या पत्राला दिलेल्या उत्तरानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ही एखाद्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर असेलली गदा आहे, असंही काहीचं म्हणणं आहे. आता यावर प्रत्येक युजरचं मत वेगवेगळं असू शकतं.पण फेसबुकने मात्र लोकेशनचा संबंध युजर्ससाठी असलेल्या जाहिरातींशी असल्याचं सांगून त्यांचं ट्रेड सिक्रेट खुल केलं आहे. ================================================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: Facebook, Technology

    पुढील बातम्या