टेक्नोलाॅजी

  • Associate Partner
  • diwali-2020
  • diwali-2020
  • diwali-2020

या दिवाळीत घ्या बजेटफ्रेंडली स्मार्टफोन: Honor 10X lite लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

या दिवाळीत घ्या बजेटफ्रेंडली स्मार्टफोन: Honor 10X lite लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

दिवाळीनिमित्त तुम्ही चांगल्या स्मार्टफोनच्या शोधात असाल तर Honor 10X lite हा स्मार्टफोन तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.

  • Share this:

मुंबई, 31 ऑक्टोबर:  नवीन स्मार्टफोन घेण्याच्या विचारात तुम्ही असाल तर ऑनरने (Honor 10X lite) हा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनची बॅटरी 5000mAh आहे. 22.5 वॉट फास्ट चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट करतो. हा फोन 30 मिनिटात 46 टक्क्यांपर्यंत चार्ज होत असल्याचा कंपनीचा दावा आहे. आणि 48 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे Honor 10X Lite मध्ये गुगल मोबाईल सर्विसेस (GMS)दिली जात नाही.

ऑनर 10X lite मधील आकर्षक फिचर्स

ऑनर 10X liteमध्ये 6.667 इंचाचा फूल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचं रेजोल्यूशन 1080 X2400 पिक्सल आहे. या फोनमध्ये पुढच्या आणि मागच्या बाजूला कॅमेरासाठी होल पंच कटआऊट देण्यात आला आहे. फोन स्लीम आहे. त्यामुळे दिसायला अतिशय आकर्षक दिसतो. स्क्रीन टू बॉडी रेशियो 90.3 टक्के आहे. हँडसेटमध्ये 4 जीबी रॅम प्लस 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512 जीबी पर्यंत वाढवता येऊ शकतो. ऑनर 10 एक्स लाइटमध्ये ऑक्टा कोर किरीन प्रोसेसर दिला आहे. कंपनीने प्रोडक्ट पेजवर प्रोसेसरचे नाव नाही. परंतु, ऑनरच्या या फोनमध्ये किरीन हायसिलिकॉन 710 चिपसेट दिला आहे. फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, 2 मेगापिक्सलचा डेप्थ आणि 2 मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा होल पंच कॅमेरा दिला आहे.

बजेटफ्रेंडली ऑनर 10X lite

ऑनरने लाँच केलेला हा फोन तुमच्या खिशाला परवडेल असा आहे. ऑनरने (Honor 10X lite) आत्ता सौदी अरेबियामध्ये लाँच करण्यात आला आहे. तिथे त्याची किंमत SAR 799 आहे म्हणजे भारतीय चलनाप्रमाणे हा फोन 15,900 रुपयांना विकला जाणारा आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 31, 2020, 12:08 PM IST

ताज्या बातम्या