फिटनेसप्रेमी आणि फॅशन फाॅलोअर्सची पहिली पसंत - HONOR Band 5i

फिटनेसप्रेमी आणि फॅशन फाॅलोअर्सची पहिली पसंत - HONOR Band 5i

फिटनेस रुटिन फॉलो करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमित फिटनेस ट्रॅकिंग. त्यासाठी HONOR Band 5i ची TruSeen 3.0 टेक्नाॅलाॅजी तुमचे हार्टरेट मॉनिटर करते.

  • Share this:

नव्या वर्षात प्रत्येक जण फिटनेस रुटिन ठरवतोय. तसा संकल्प करतोय.पण चांगल्या मदतीशिवाय हे कठीण रुटिन नियमित करणं सोपं नाही. तुम्ही जिममध्ये अनेक तास घाम गाळल्यानंतर तुमच्या किती कॅलरीज बर्न झाल्या, हे कळलं तर दुसऱ्या दिवशी हेच रुटिन सोपं जातं. तेव्हा तुम्ही फिटनेस रुटिन ट्रॅक करण्यासाठी कोणाला तरी शोधत असाल तर आमच्याकडे एक चांगला उपाय आहे. अलिकडेच लाँच झालेला HONOR Band 5i हा संपूर्णपणे फिटनेस ट्रॅकर तर आहेच, पण तो एक आधुनिक फॅशन स्टेटमेंटही आहे. टेक्नाॅलाॅजीच्या बाबतीत हा इतर बँड्सना मागे टाकतो.

स्टाइलिश डिझाइन आणि कलर डिस्प्ले

HONOR Band 5i 2.4cm कलर पूर्ण टच स्क्रीन डिस्प्ले आणि 160 x 80 HD रिझोल्युशनसह येतो. स्ट्रॅपबद्दल सांगायचं तर हा बँड सिलिकाॅन रबर स्टँपसोबत येतो. तसंच यात चार्जिंगसाठी बिल्ट-इन USB कनेक्टर आहे, त्यामुळे तुम्ही हा बँड तुमच्या लॅपटॉपला लावून चार्ज करू शकता. आणि एकदा चार्ज केल्यावर याची बॅटरी आठवडाभर चालते.त्यामुळे सारखं सारखं चार्जिंगचं टेंशन न घेता तुम्ही तुमच्या फिटनेस रुटिनवर लक्ष देऊ शकता. एवढंच नाही तर HONOR च्या नव्या Watch Face Store मधून तुम्ही प्रत्येक प्रसंगी शोभून दिसेल असं तुमचं आवडतं किंवा ट्रेंडिंग वॉच फेस निवडू शकता. तुम्ही हा स्टाइलिश फिटनेस बँड घालून मिरवायची संधी अजिबातच सोडू नका.

तुमच्या फिटनेसला करा सहज ट्रॅक

फिटनेस रुटिन फॉलो करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमित फिटनेस ट्रॅकिंग. त्यासाठी HONOR Band 5i ची TruSeen 3.0 टेक्नाॅलाॅजी तुमचे हार्टरेट मॉनिटर करते. म्हणजे तुमच्या हार्टरेटला लक्षात ठेवूनच तुमच्या वर्कआऊटची वेळ वाढवू शकते किंवा कमी करू शकते. याशिवाय याची TrueSleep2.0 टेक्नाॅलाॅजी तुमच्या झोपेचं निरीक्षण करते. त्यात 6 सर्वसाधारण झोपेचे प्रॉब्लेम ओळखते. एवढंच नाही तर तुमची झोप चांगली व्हावी म्हणून 200 हून जास्त कस्टमाइज सल्लेही देते. तुम्ही Honor Band 5i वर OTA अपडेट करून SpO2 मॉनिटर करू शकता. त्यामुळे तुमच्या रक्तातली ऑक्सिजनची पातळी ट्रॅक होते. त्यामुळे बॉडी वर्कआउटच्या वेळी किंवा उंच ठिकाणी प्रवासाला गेलात तर तुमच्या शरीरात कसा बदल होतो, हे तुम्हाला कळतं.

तुमचा खाजगी ट्रेनर

फिटनेस रुटिन फॉलो करताना अनेक इनडोअर आणि आऊटडोअर अॅक्टिव्हिटीज कराव्या लागतात. यावेळी वन स्टॉप सोल्युशन मिळालं तर आणखी काय हवं? HONOR Band 5i च्या मदतीनं तुम्ही उच्च प्रतीचं फिटनेस ट्रॅकिंग करू शकता. हार्ट-रेट मॉनिटरिंग, वर्कआउट टाइम, डिस्टन्स, स्ट्राइड फ्रिक्वेंसि, कॅलेरी आणि एरोबिक्स यासारख्या अॅक्टिव्हिटीज ट्रॅक होतात. या बँडची खासीयत म्हणजे 50 मीटरपर्यंत हा पाण्यात राहू शकतो. शिवाय यात इनडोर रनिंग, आउटडोर रनिंग, वाॅकिंग आणि साइकिलिंग यांसारखे एकूण 9 इनबिल्ट फिटमेस मोड्स दिलेत. म्हणजे हा बँड आहे की नाही पर्सनल ट्रेनरसारखा!

स्मार्ट फीचर्स

HONOR Band 5i मध्ये अनेक स्मार्ट फीचर्स दिलेत. हा बँड रिमोट कॅमेरा फंक्शनला सपोर्ट करतो. त्याबरोबर हा बँड तुमच्या स्मार्टफोनच्या ब्लू टुथला जोडता येतो. तसं केल्यावर तो आपोआप रिमोट इंटरफेस बनतो. तुम्ही ब्लू टुथशी हा बँड जोडलात तर फोनमधली म्युझिक प्लेलिस्टही कंट्रोल करू शकता. कोणाचा फोन आला तर बँडमध्येच तो कोणाचा ते कळू शकतं. मग खिशातून फोन काढायचा की नाही, हे ठरवू शकता. फोन कटही करू शकता. तुम्ही बँडवर मेसेजही पाहू शकता. तुम्ही तुमचा फोन कुठे विसरून आलात तर या बँडचं फोन फाइंडर फंक्शन तुमचा फोन लगेच शोधू शकेल.

किंमत

HONOR Band 5i हा काळ्या रंगात आहे. याची किंमत 1,990 रुपये आहे. Amazon प्राइम मेंबर्स 18 जानेवारी 12 वाजेपर्यंत आणि इतर ग्राहक 19 जानेवारीपासून हा बँड ऑर्डर करू शकतात. आतापासून तुमची ऑर्डर करा आणि फिटनेस रुटिन तयार करा. लवकरच नव्या वर्षाचा तुमचा संकल्प पूर्ण होणार आहे.

HONOR Band 5i वरचा SpO2 अपडेट फेब्रुवारीच्या शेवटी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

This is a partnered post.

First published: January 21, 2020, 8:09 PM IST
Tags:

ताज्या बातम्या