HONOR 9X आणि Samsung M30s यापैकी कोणता स्मार्टफोन आहे योग्य चाॅइस?

HONOR 9X आणि Samsung M30s यापैकी कोणता स्मार्टफोन आहे योग्य चाॅइस?

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात फोन खरेदी करण्याआधी त्याचा कॅमेरा कसा आहे, हे पाहिलं जातं.

  • Share this:

प्रत्येक जण या नव्या वर्षाची सुरुवात एका नव्या आणि चांगल्या फोननं करतोय. गेल्या दशकात आपण पाहिलं की सर्वच ब्रँडनं टेक्नाॅलाॅजीमध्ये मोठं योगदान दिलं आणि या दशकात HONOR नं टेक्निक ब्रँडमध्ये मार्केटमध्ये आपलं मोठं नाव ठसवलं. या नव्या दशकात स्मार्टफोन मार्केटमध्ये स्पर्धा जास्तच वाढणार आहे. याचा अर्थ नव्या दशकात स्मार्टफोन मार्केटमध्ये स्पर्धा अजून वाढणार आहे. स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर नुकताच लॉन्च झालेला HONOR चा 9X, Samsung M30s ला जोरदार टक्कर देतोय. हे दोन्ही स्मार्टफोन लोकांसाठी शानदार आणि स्वस्त आहेत. आकर्षक किंमत आणि चांगले फीचर्स असलेला HONOR 9X लोकांच्या पसंतीस उतरलाय. पण सगळ्यांना एकच प्रश्न पडलाय HONOR 9X चांगला आहे की Samsung M30s?

डिझाइन आणि डिस्प्ले

HONOR 9X 3D कर्व्हड पॅटर्नमध्ये आहे आणि त्याच्या ग्लॉसी फिनिशमुळे हा फोन प्रीमियम लूक देतो. याशिवाय फोनच्या मागच्या पॅनलमध्ये X आकाराचं डिझाइन आहे. त्यामुळे हा फोन दुसऱ्यांपेक्षा वेगळा ठरतो. तर Samsung M30s चं डिझाइन बरचसं Samsung Galaxy M10 आणि M20 सारखं आहे. HONOR 9X 6.59” च्या साइजबरोबर FHD डिस्प्लेबरोबर येतं. तर या तुलनेत Samsung M30s 6.4” U drop बरोबर FHD SAMOLED डिस्प्ले आहे. शिवाय HONOR 9X 91% चा स्क्रीन रेश्यो देतो. दोन्ही फोनमध्ये Type-c चार्जिंगबरोबर फिंगर प्रिंट अनलॉक फीचरही दिलंय. सोप्या शब्दात सांगायचं तर डिझाइन आणि डिस्प्लेच्या तुलनेत HONOR 9X नं बाजी मारलीय.

कॅमेरा

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात फोन खरेदी करण्याआधी त्याचा कॅमेरा कसा आहे, हे पाहिलं जातं. HONOR 9X मध्येही याकडे लक्ष दिलंय. फोनमध्ये ट्रिपल रियल कॅमरा सेटअप आहे. ज्यात 48MPचा प्रायमरी कॅमेरा आहे. शिवाय 120 डिगरी व्ह्यू देणारा 8MP चा सुपर वाइड अँगल लेंस आणि 2MP चा डेप्थ कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेऱ्याबद्दल सांगायचं झालं तर 16MP पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे, जो सॉफ्ट लाइट, बटरफ्लाय लाइट, स्केटर्ड लाइट अशा 8 वेगवेगळ्या मोड्सना सपोर्ट करतो. या किमतीत तुम्हाला फक्त HONOR 9X मध्ये पॉप-अप कॅमेरा मिळेल. याशिवाय कॅमेऱ्यात पॉप-अप कॅमेरा इंटेलिजेंट फॉल डिटेक्षन, डाउनवर्ड प्रेशर प्रोटेक्शन आणि डस्ट अँड स्प्लेश प्रोटेक्शन हे फीचर्स आहेत. दुसरीकडे Samsung M30 48MP8MP5MP च्या ट्रिपल सेटअप कॅमेऱ्यानं तुम्ही चांगले फोटो काढू शकाल, पण यात पॉप-अप सेल्फी फीचर मिळणार नाही. यात 16MP Drewdrop फ्रंट कॅमेरा आहे. कॅमेऱ्यात HONOR 9X आपल्या पॉप अप सेल्फी फीचरमुळे Samsung M30s ला मागे टाकतो.

कामगिरी

दोन्ही फोन Android 9.0 OS सह येतात. HONOR 9X शानदार Kirin 710 F ऑक्टा कोर प्रोसेसरवर चालतो. यामुळे फोन चांगला चालतो. तर दुसरीकडे Samsung M30s मध्ये Exynos 9611 प्रोसेसर आहे. किरिन 710 एफ ऑक्टा कोर प्रोसेसरमुळे HONOR 9X Samsung M30s पेक्षा जलद मल्टिटास्किंग करतो आणि फोनमध्ये हाय ग्राफिक्स गेम्स कुठल्याही अडथळ्याशिवाय खेळता येतात. या दोन्ही माॅडेलमध्ये 4/6 GB RAM बरोबर 128 GB इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे. दोन्ही फोनच्या बॅटरीचं आयुष्य खूप चांगलं आहे. फास्ट चार्जिंग होत असल्यानं तुम्ही कमी वेळेत फोन चार्ज करून बराच काळ वापरू शकाल. पण तरीही आपल्या परफाॅर्मन्ससाठी ओळख असणाऱ्या Kirin 710 F प्रोसेसरमुळे HONOR 9X आपल्या कामगिरीत Samsung M30s ला मागे टाकतो.

किंमत

आता वरील माहितीप्रमाणे HONOR 9X फीचरमध्ये Samsung M30s पेक्षा शानदार आहे हे तर नक्कीच. तर आता नजर टाकू यांच्या किमतींवर. HONOR 9X च्या 4GB-128GB वॅरिएंची  किंमत 13,999 रुपये आहे. पण 19 जानेवारी ते 22 जानेवारीपर्यंत असलेल्या ऑफरच्या पहिल्या दिवशी म्हणजे 19 जानेवारी रोजी या फोनवर 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. म्हणजे 12,999 रुपयांना हा फोन मिळेल. याशिवाय 19 जानेवारीपासून 22 जानेवारीपर्यंत असणाऱ्या या ऑफरमध्ये तुम्ही ICICI Bank क्रेडिट कार्ड आणि Kotak Bank डेबिट तसंच क्रेडिट कार्ड यांनी खरेदी केली तर 10% डिस्काउंट मिळेल. ऑफरमध्ये खरेदी केल्यावर 2,200 रुपयांचा तुम्हाला JIO रिचार्ज वाउचर मिळेल. त्यात तुम्ही रोज 50 रुपये प्रति रिचार्जप्रमाणे 44 रिचार्जपर्यंत वापरू शकता. HONOR 9X च्या 4GB-128GB वॅरिएंची  किंमत 13,999 रुपये आहे, तर 6GB128GB स्टोरेज वॅरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. पण बँक ऑफरचा फायदा घेतलात तर तुम्ही 15,299 रुपयांत फोन खरेदी करू शकता. दुसरीकडे Samsung M30sच्या 4GB-64GB वॅरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे, तर 6GB128GB वॅरिएंट 16,999 रुपयांना मिळतो. दोन्ही फोन्सची किंमत सारखी असली तरीही HONOR 9X मध्ये त्याच किमतीत चांगले फीचर्स मिळतात.

निष्कर्ष

दोन्ही फोन्सच्या फीचर्सची तुलना केली तर HONOR 9X कमी किमतीत शानदार फीचर्स देतो. शिवाय या किमतीत पॉप-अप कॅमेरा देणारा हा एकुलता एक ब्रँड आहे आणि ऑफर्सचा विचार करता हा आणखी स्वस्त मिळतोय. प्रोसेसरची तुलना केली तर HONOR चा किरिन 710 Samsung M30s च्या Exynos 9611 पेक्षा जलद आणि उत्तम मानला जातो. याशिवाय HONOR 9X मध्ये बराच काळ चालणारी बॅटरी आहे.  या सर्व फीचर्सकडे पाहता हे अगदी स्पष्ट आहे की, HONOR 9X ही चांगली पसंती आहे. याच्या स्वस्त किमतीत प्रत्येक जण पॉप अप कॅमेरावाला फोन वापरेल आणि या कारणानं HONOR 9X वरचढ आहे.

This is a partnered post.

First published: January 21, 2020, 7:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या