शानदार स्मार्टफोन HONOR 9X साठी दमदार प्रोसेसर Kirin 710

शानदार स्मार्टफोन HONOR 9X साठी दमदार प्रोसेसर Kirin 710

Kirin 710 प्रोसेसरमध्ये 12nm टेक्नॉलजी वापरलीय.हा चिपसेट छोटा आहे. याच्यामुळे कंपनी स्मार्टफोनमध्ये आणखी फीचर्सचा समावेश करू शकते.

  • Share this:

स्मार्टफोन्स आता पहिल्यापेक्षा जास्त स्मार्ट झालेत. आता एका फोनचा परफॉर्मन्स फक्त त्याची बॅटरी, स्टोअरेज, कॅमेरा एवढ्यावरच सीमित नाही, तर हे सगळं सहज वापरता येण्यासाठी चांगल्या प्रोसेसरचीही गरज आहे. प्रोसेसरमध्ये Kirin प्रोसेसर चांगल्या कामगिरीसाठी ओळखले जातात. हा Huaweiचा इन-हाउस मॅनिफॅक्चरिंग आहे आणि याचा सब-ब्रँड HONOR च्या फोन्समध्ये जास्त करून पाहायला मिळतो. यात Kirin 710F असलेला प्रोसेसर HONOR चा लेटेस्ट फोन HONOR 9X मध्ये आहे. Kirin 710F चिपसेट कंपनीनं सादर केलेल्या शानदार आणि दमदार चिपसेटपैकी एक आहे.

नुकतंच Honor ने आपल्या X सीरिजचा नवा माॅडेल Honor 9X ला लॉन्च केलंय. Kirin 710F शिवाय या डिव्हाइसमध्ये तुम्हाला 16MP चा AI पॉप अप सेल्फी कॅमेरा आणि 48MP8MP2MP चा AI रियर कॅमेरा मिळतो. तसंच या फोनमध्ये FHD Full View Display, 4GB/6GB RAM, 128GB ROM (expandable upto 512GB) aur 4,000mAh बॅटरी आणि अनेक शानदार फीचर्स आहेत. आपण जाणून घेऊ या की हा प्रोसेसर HONOR 9X ला आणखी पाॅवरफुल कसा बनवतो ते!

Kirin 710ची खासियत

Kirin 710 प्रोसेसरमध्ये 12nm टेक्नॉलजी वापरलीय.हा चिपसेट छोटा आहे. याच्यामुळे कंपनी स्मार्टफोनमध्ये आणखी फीचर्सचा समावेश करू शकते. असंच कंपनीनं HONOR 9X मध्येही केलंय. यात पॉप अप कॅमेरा, मजबूत बॅटरी, 48MP चा  प्राइमरी सेंसर, 8MP ची सुपर वाइड लेंस आणि 2MP चा डेप्थ सेंसरचा ट्रिपल कॅमेरा आणि

अनेक उत्तम फीचर्स आहेत.

स्मार्टफोनला देतो जास्त पाॅवर

या प्रोसेसरमध्ये 4 छोटे छोटे ARM Cortex-A53 कोर आहेत आणि 4 मोठे ARM Cortex-A73 कोर आहेत. याचा ऑक्टा कोर CPU स्मार्टफोनला जास्त पाॅवर देत त्याच्या परफॉर्मन्सला शानदार बनवतं. आता या फोनद्वारे तुम्ही अनेक कामं कुठल्याच अडथळ्याशिवाय करू शकता. मग ती HONOR 9X च्या ट्रिपल कॅमेऱ्यातून फोटोग्राफी असो किंवा नेटफ्लिक्सवरचे सिनेमे पाहणं असो. Kirin 710 चिपसेटमुळे Honorच्या  Kirin 659 प्रोसेसरच्या तुलनेत Honor 9X मध्ये तुम्हाला सिंगल कोर परफॉर्मन्समध्ये 75% चांगला फायदा होईल आणि मल्टि कोप टेस्टमध्ये 68% फायदा होईल.

आता गेमिंग होईल आणखी रंजक

या चिपसेटमध्ये ARM Mali-G51 MP4 GPU सुद्धा आहे. कंपनीचा दावा आहे की Kirin 710 प्रोसेसर independent ISP आणि DSP द्वारे AI फोटो फीचर्स आणि गेमिंगचा अद्भुत अनुभव देईल. याचा अर्थ असा की HONOR 9X स्मार्टफोनमध्ये तुम्ही फक्त 48MP च्या AI ट्रिपल कॅमेऱ्याचाच आनंद घेणार नाही तर PUBG aur Fortnite सारखे मोठे आणि हेवी गेम्सही खेळू शकाल, तेही अडथळ्याशिवाय. HONOR 9X मध्ये GPU Turbo 3.0 टेक्नाॅलाॅजी आहे. जी तुम्हाला टच इनपुट लेटेन्सी 36% कमी करते. सरळ सांगायचं तर तुम्हाला तुमच्या स्क्रीनच्या टच रिस्पाँडमध्ये कसलीच कमतरता जाणवणार नाही.

बजेट स्मार्टफोनमध्ये हाय एण्ड चिपसेटची पाॅवर

HONOR X सीरिज कमी पैशात फ्लॅगशिप अनुभव देण्यासाठी ओळखला जातो. HONOR 9Xही असाच स्मार्टफोन आहे, ज्यात कंपनीनं जवळजवळ प्रत्येक फीचर आणि स्पेसिफिकेशन युझर्सची मागणी आणि गरज लक्षात घेऊनच तयार केलीयत. पण या सगळ्यावर काम करण्यासाठी पाॅवरची गरज आहे. ती Kirin 710 चिपसेट उत्तमरित्या पूर्ण करते. हे फीचर्स एका बजेट स्मार्टफोनमध्येही तुम्हाला हाय एण्ड स्मार्टफोनसारखा अनुभव देईल.

AI केपेबिलिटीस

Kirin 710F मुळे तुम्हाला तुमच्या Honor 9X मध्ये AI हँडहेल्ड डिटेक्षन, AI लाइट डिटेक्षन, चांगल्या प्रतीसाठी AI प्रोसेसिंग आणि AI व्हिडिओ स्टेबलाइझेशन सारखे अनेक AI फीचर्स मिळतील. याचा AI सीन रेकगनायझेशन 22 कॅटेगरीत 500 हून अधिक सीन्स आपोआप ओळखतो. म्हणजे फोनचा कॅमेरा आकाश, पाणी, खाणं, फूल, शब्द यासारख्या असंख्य गोष्टी ओळखेल. हे सगळे फीचर्स तुम्हाला तुमची फोटोग्राफी जास्त चांगली करून देतील.

कनेक्टिविटी

असे अनेक स्मार्टफोन्स बाजारात मिळतात, ज्यात 2 सिमकार्ड चालतात. पण थोड्याच स्मार्टफोन्समध्ये तुम्हाला दोन्ही सिम स्लॉटमध्ये 4G सपोर्ट मिळेल. म्हणजे समजा तुम्ही सिम 1मध्ये प्रायमरी कॉलिंग आणि मेसेजिंग करत असाल आणि सिम 2मधून इंटरनेट चालवत असाल तर दुसऱ्या सिममध्ये 4G स्पीड मिळत नाही. Kirin 710 मुळे तुमच्या समस्या संपतील. तो dual-4G VoLTE सपोर्ट करतो. Honor 9X मध्ये दोन सिम कार्ड वापरताना दुसऱ्या सिमचं नेटवर्क 3G किंवा 2G वर येत नाही. तुम्ही सहज इंटरनेट चालवू शकता.

हा चिपसेट तुम्हाला 600Mbps हून जास्त डाऊनलोड स्पीड देतो. त्यामुळे अतिशय कमी वेळात तुम्ही गेम्स, गाणी आणि व्हिडिओ डाऊनलोड करू शकता. यात तुम्हाला 150Mbps ची अपलोडिंग स्पीडही मिळेल. सोशल मीडियावर तुम्हाला फोटो किंवा मोठे व्हिडिओ अपलोड करायचे असतील किंवा ईमेलवर हेवी फाइल अपलोड करायची असेल तर कमी वेळेत ही कामं होतील.

Honor 9X ची किंमत

या फोनचे दोन वॅरिएंट आहेत ते तुम्ही Flipkart वरून खरेदी करू शकता. HONOR 9X च्या 4GB-128GB वॅरिएंटची  किंमत 13,999 रुपये आहे. तर 6GB128GB स्टोरेज वॅरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. पण 19 जानेवारी ते 22 जानेवारीपर्यंत असलेल्या ऑफरच्या पहिल्या दिवशी म्हणजे 19 जानेवारी रोजी या फोनवर 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. म्हणजे 12,999 रुपयांना हा फोन मिळेल. याशिवाय 19 जानेवारीपासून 22 जानेवारीपर्यंत असणाऱ्या या ऑफरमध्ये तुम्ही ICICI Bank क्रेडिट कार्ड आणि Kotak Bank डेबिट तसंच क्रेडिट कार्ड यांनी खरेदी केली तर 10% डिस्काउंट मिळेल. ऑफरमध्ये खरेदी केल्यावर 2,200 रुपयांचा तुम्हाला JIO रिचार्ज वाउचर मिळेल. त्यात तुम्ही रोज 50 रुपये प्रति रिचार्जप्रमाणे 44 रिचार्जपर्यंत वापरू शकता. सोबत तुम्हाला 125GB जास्त इंटरनेट डेटा मिळेल, जो तुम्ही 25 रिचार्जपर्यंत 5GB प्रति रिचार्ज रिडिम करू शकता.

इतके चांगले फीचर्स, डिझाइन प्रोसेसर Kirin 710 असूनही कंपनीचा हा स्पार्टफोन किफायतशीर किमतीत मिळतोय. जोमदार Kirin 710 मुळे फोनच्या कामगिरीत काही तक्रार करायला जागा नाही. युझर्सना कमी बजेटमध्ये गेमिंग, व्हिडिओ, पॉप-अप कॅमेरा याचा अडथळ्याशिवाय आनंद देणारा स्मार्टफोन बाळगण्याची संधी मिळतेय.

 

First published: January 21, 2020, 7:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या