नवी दिल्ली, 20 डिसेंबर : होंडा कंपनीने (Honda Motor Company) जगभरातून मोठ्या संख्येने आपल्या विक्री केलेल्या कार्स परत मागवल्या आहेत. कंपनीने, गाड्यांमध्ये सेफ्टीसंबंधी आलेल्या काही त्रुटींमुळे कार पुन्हा मागवल्या आहेत. कंपनीने तब्बल 1.79 मिलियन वाहनं परत मागवली आहेत.
कंपनीने सर्वाधिक 1.4 मिलियन वाहनं यूएसमधून रिकॉल केली आहेत. एका रिकॉलमध्ये 2,68,000 यूनिट्, 2002-2006 होंडा सीआरवी सामिल आहे. या कारच्या पॉवर विंडो मास्टर स्विचमध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या त्रुटीमुळे आतापर्यंत दुखापतीचा कोणताही रिपोर्ट आलेला नाही. मात्र आगीसंबंधी 16 रिपोर्ट समोर आले आहेत.
त्याशिवाय कंपनीने 7,35,000 यूनिट्स, यूएस Accord 2018-2020 ही रिकॉल केल्या आहेत. Accord Hybrid 2019-2020 चेही काही यूनिट्स रिकॉल करण्यात आले आहेत. याच्या बॉडी कंट्रोल मॉड्यूल सॉफ्टवेयरला अपडेट केलं जाईल. त्याशिवाय होंडा सिविक हायब्रिड, Honda Fit, Honda Acura ILX चे यूनिट्सही रिकॉल करण्यात आले आहेत.
होंडा भारतातही ऑटोमोबाईल ब्रँड म्हणून मोठ्या प्रमाणात पॉप्युलर आहे. ऍक्टिवा स्कूटर भारतात सर्वात पॉप्युलर टू व्हिलर्सपैकी एक आहे. नुकतीच या स्कूटरने भारतीय बाजारात 20 वर्ष पूर्ण केली आहेत. त्यानिमित्ताने Honda Activa Anniversary Edition लाँच केलं होतं. होंडा ऍक्टिवाचं हे खास एडिशन भारतात 66,816 रुपयांच्या सुरुवाती किंमतीत लाँच केलं होतं.