नवी दिल्ली, 14 एप्रिल : तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या महिन्यात
(एप्रिल 2022) अनेक कार उत्पादक कंपन्या नवीन कार लाँच करणार आहेत. या गाड्यांमध्ये तुम्हाला अनेक अॅडव्हान्स्ड फीचर्स आणि अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीचा वापर केलेला पाहायला मिळेल. याशिवाय काही कंपन्या पॅसेंजर कारची अपडेटेड व्हर्जन्सही लाँच करणार आहेत. या महिन्यात लाँच होणाऱ्या गाड्यांमध्ये अपडेटेड मारुती सुझुकी एर्टिगा
(Maruti Suzuki Ertiga), अपडेटेड फेसलिफ्ट मारुती सुझुकी एक्सएल 6
(XL6) प्रीमियम एमपीव्ही
(MPV) आणि सिटी हायब्रीड
(City Hybrid) सेडान या होंडा कंपनीच्या नवीन कारचा समावेश आहे.
होंडा सिटी हायब्रिड (Honda City Hybrid)
14 एप्रिल रोजी म्हणजे आज होंडा सिटी हायब्रिड भारतात लाँच होणार आहे. टेक्नॉलॉजीचा विचार करता ही कार अधिक अॅडव्हान्स्ड असण्याची अपेक्षा आहे. यातील इलेक्ट्रिक मोटर्सना 1.5 लिटर फोर-सिलिंडर इंजिनसह जोडण्यात आलं आहे. यामध्ये, एक इलेक्ट्रिक मोटर करंट जनरेटर म्हणून काम करते, तर दुसरी प्रोपल्शन मोटर म्हणून काम करते. ही कार तिच्या सेगमेंटमधील सर्वाधिक मायलेज देणारी कार असू शकते. 26 किमी प्रतिलिटर मायलेज मिळेल अशी अपेक्षा आहे.
अपडेटेड मारुती सुझुकी एर्टिगा (Maruti Suzuki Ertiga) -
मारुती सुझुकी एर्टिगा 2022 ही कार 15 एप्रिल रोजी लाँच होणार आहे. या न्यू जनरेशन एर्टिगामध्ये अनेक अॅडव्हान्स्ड फीचर्स उपलब्ध होणार आहेत. लाँच झाल्यावर ही कार महिंद्रा एक्सयुव्ही 700
(Mahindra XUV700), ह्युंडाई अल्कझार
(Hyundai Alcazar) आणि किया क्रेन्स
(Kia Carens) या गाड्यांना टक्कर देईल, असं म्हटलं जात आहे. नवीन एर्टिगामध्ये 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स, 1.5 लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन, पॅडल शिफ्टर्स, स्प्लिट फोल्डिंग सीट यासह अनेक कनेक्टेड कार अॅडव्हान्स्ड फीचर्स असणार आहेत.
मारुती सुझुकी एक्सएल6 फेसलिफ्ट (2022 Maruti Suzuki XL6 facelift) -
मारुती सुझुकी 21 एप्रिल रोजी एर्टिगा फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करणार आहे. नेक्सा
(Nexa) वेबसाइट आणि नेक्सा स्टोअर्सवर 11 हजार रुपयांच्या पेमेंटसह या गाडीचं बुकिंग सुरू झालं आहे. 2022 मारुती सुझुकी एक्सएल 6
(2022 Maruti Suzuki XL6) या कारमध्ये अनेक कॉस्मेटिक आणि फीचर अपडेट्स असण्याची अपेक्षा आहे. यात ड्युअल-टोन पेंट थीम आणि सनरूफदेखील असू शकतं. आगामी XL6 मध्ये आरामदायक सोयींसाठी अनेक फीचर्स दिली जाण्याची शक्यता आहे. नवीन बलेनोप्रमाणं
(Baleno) अपडेटेड एक्सएल 6 देखील हेड-अप डिस्प्लेसह
(HUD) लाँच केली जाऊ शकते.
या महिन्यात लाँच होणाऱ्या वरील तिन्ही कारमध्ये अनेक अॅडव्हान्स्ड फीचर्स आणि अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी दिली जाणार आहे. त्यामुळे या कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा फायदा होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.