Home /News /technology /

होम थिएटरसाठी नवा TV घ्यायचा विचार करत असाल, तर ही माहिती आधी वाचा...

होम थिएटरसाठी नवा TV घ्यायचा विचार करत असाल, तर ही माहिती आधी वाचा...

TV

TV

थिएटरमध्ये सिनेमा पाहण्याचा आनंद मिस करताय का? मग होम थिएटरसाखा OLED TV घ्यायचा विचार करत असाल तर हे आहेत बाजारातले बेस्ट फाईव्ह OLED टीव्ही आणि त्याच्या किमती...

    मुंबई, 01 ऑक्टोबर : थिएटरमध्ये सिनेमा पाहण्याचा आनंद मिस करताय का? वर्क फ्रॉम होम करून झाल्यावर एखादा छानसा सिनेमा बघावासा वाटतोय तर मग OLED टीव्ही हवा असं वाटत असेल. थोड्याच दिवसात फेस्टिव्ह सीझन सुरू होईल आणि मग बाजारातला उत्तम टीव्ही घ्यावासा वाटेल. Organic Light Emitting Diodes अर्थात OLED टीव्हीची खासियत म्हणजे या टीव्हीच्या पॅनलला खूप कमी वीज लागते आणि चित्राचा दर्जाही उत्तम असतो. बाजारात असलेले टॉप 5 OLED TV कुठले आणि त्यांची किंमत काय हे घ्या जाणून... 1. Sony Bravia A9F OLED : सोनीच्या सर्वांत नव्या Bravia A9F OLED  सीरिजमधील टीव्हीत X1 Ultimate processor असल्याने तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो. या टीव्हीमध्ये पिक्सेल कॉन्ट्रास्ट बूस्टर आहे. जे उच्च ब्राइटनेस पातळीवर काम करतो तसंच यात वाईड अँगलदेखील आहे. उत्तम आवाजासाठी 3.2 मल्टिडायमेन्शल साउंड सिस्टिम दिलेली आहे. या टीव्हीच्या 55 इंचाच्या मॉडेलची किंमत 3.99 लाख रुपये आहे, तर 65 इंची मॉडेल 5.59 लाख रुपयांना उपलब्ध आहे. 2. LG AI ThinQ OLED77W8PTA : या वर्षाच्या सुरुवातीलाच हे मॉडेल आलं होतं. या मॉडेलच्या डिझाइनसाठी याला पुरस्कार मिळाले आहेत. अल्ट्राथिन असलेला हा टीव्ही तुमच्या लिंविंग रूमची शोभा वाढवेल. 77 इंचाच्या या मॉडेलची किंमत 32.9 लाख रुपये आहे. 3. Sony Bravia A1 Series : सोनीचं हे मॉडेल 4K क्लॅरिटी देतं. त्यासोबत ब्राइटनेस, कलर आणि HDR फॉरमॅटदेखील उत्तम आहे. सोनीची खासियत असलेल्या TRILUMINOS  डिस्प्लेमुळे उच्च दर्जाचं चित्र तुम्ही अनुभवू शकता. 55 इंचाच्या टीव्हीची किंमत 3.05 लाख रुपये आहे, तर 65 इंचाच्या मॉडेलची किंमत 4.05 लाख रुपये आहे. 4. LG OLED 55B7T : डॉल्बी व्हिजनसह प्रीमियम HDRची वैशिष्ट्यं या टीव्ही मॉडेलमध्ये पहायला मिळतील. Dolby Atmos, infinite contrast and webOS अशी सहज वापरता येणारी अनेक फिचर या मॉडेलमध्ये आहेत. हा 55 इंचाचा OLED टीव्ही 2.25 लाख रुपयांना तुम्ही विकत घेऊ शकता. 5. METZ 55 Inch 4K UHD OLED TV : शार्प लुक आणि क्लिअर लाईनसह हे मॉडेल तयार करण्यात आले आहे. नव्या घरातील फर्निचरमध्येही हा टीव्ही शोभून दिसेल. 3.6 mm स्क्रिनच्या डिझाइनमुळे तुम्हाला मोठ्या पिक्चरचा आनंद लुटता येतो. सामान्य टीव्हीच्या तुलनेत तिप्पट अधिक आवाज टीव्हीतून तुम्हाला ऐकता येईल आणि याची फ्रिक्वेन्सी आहे 50 Hzs. 55 इंचांच्या मॉडेलची किंमत फक्त 99,999 रुपये आहे.मग विचार कसला करताय, आजच बुक करा तुमच्या आवडीचा OLED टीव्ही आणि घरबसल्या सिनेमागृहासारखा आनंद मिळवा.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Tv

    पुढील बातम्या