ऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम

सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयामध्ये सोशल मीडिया वापरण्यावर सरकारने काही नियम आणि अटी घातल्या आहेत.

  • Share this:

डेटा सुरक्षा आणि हँकिंगच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवण्यासाठी गृह मंत्रालयानं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच सोशल मीडिया पॉलीसी जारी केली आहे. नव्या पॉलिसीनुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या ऑफीसचा कम्युटर, लॅपटॉप, मोबाईल किंवा इतर दुसऱ्या डिव्हाइसवरून फेसबुक, व्हॉटसअॅपसारख्या सोशल मीडियाचा वापर करता येणार नाही. याचा वापर करण्यासाठी पुर्वपरवानगी घ्यावी लागेल.

गृहमंत्रालयाने जारी केलेल्या गाइडलाइननुसार सरकारी कर्मचाऱ्यांशिवाय कॉन्ट्रॅक्टवर काम करणारे कर्मचारी, कन्सल्टन्ट, थर्ड पार्टी इन्फर्मेशन सिस्टिम यासह इतरांनासुद्धा हा नियम लागू असणार आहे.

सोशल मीडिया संदर्भात गृहमंत्रालयानं 24 पानी नोट तयार केली आहे. त्यात म्हटलं आहे की, कोणत्याही अधिकृत माहिती सोशल मीडिया किंवा सोशल नेवर्किंग साइटवर सरकार जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत ती सार्वजनिक करता येणार नाही.

नव्या पॉलिसीत सरकारी कर्मचाऱ्यांना कोणत्याही परवानगीशिवाय ऑफिसच्या बाहेर पेन ड्राइव्ह घेऊन जाता येणार नाही. मंत्रालयाने म्हटलं आहे की, कर्मचाऱ्यांना गुप्त कागदपत्रे क्लाउड स्टोरेज सर्व्हिसेस किंवा गूगल ड्राइव्ह, ड्रॉप बॉक्स वर सेव्ह करता येणार नाही. असे आढळल्यास त्यांच्यावर डेटा लीक केल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल.

इमेल पाठवण्याबाबतही नियमावली तयार करण्यात आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना कोणतीही गुप्त माहिती इमेलमधून पाठवू नये. तसेच अधिकृत इमेल अकाउंट पब्लिक वायफायवर सुरू करू नये. तसेच घरी ऑफिशियल काम करताना वायफायचा वापर करताना मीडिया एक्सेस कंट्रोल म्हणजेत मॅक अॅड्रेस वापरण्या सल्ला दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2019 03:02 PM IST

ताज्या बातम्या