मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Nokia चा स्वस्त 5G Smartphone लाँच, पाहा काय आहे किंमत आणि फीचर्स

Nokia चा स्वस्त 5G Smartphone लाँच, पाहा काय आहे किंमत आणि फीचर्स

HMD Global ने आपला पहिला Nokia X सीरिज स्मार्टफोन लाँच केला आहे.

HMD Global ने आपला पहिला Nokia X सीरिज स्मार्टफोन लाँच केला आहे.

HMD Global ने आपला पहिला Nokia X सीरिज स्मार्टफोन लाँच केला आहे.

नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : HMD Global ने आपला पहिला Nokia X सीरिज स्मार्टफोन लाँच केला आहे. Nokia X100 हा स्मार्टफोन नोकिया एक्स सीरिजच्या Nokia X20, Nokia X10 आणि Nokia XR20 चा भाग आहे. तुलनेने या फोनची किंमत कमी आहे. यात चांगला कॅमेरा, बॅटरी आणि इतर जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहे. चांगल्या फीचर्समुळेच Nokia X100 मार्केटमध्ये चर्चेत आहे.

Nokia X100 स्पेसिफिकेशन्स -

- 6.67 इंची फुल एचडी+ डिस्प्ले

- 2400 x 1080 पिक्सल स्क्रिन रेजोल्यूशन

- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 5G चिपसेट प्रोसेसर

- फोनला 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे.

- माइक्रोएसडी कार्ड स्लॉट

- स्टोरेज मेमरी 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते.

- Android 11 OS

- 4,470mAh बॅटरी

- 18W चार्जिंग

कॅमेरा -

Nokia X100 फोनला बॅक पॅनलला 48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 5 मेगापिक्सल अल्ट्रावाइड लेन्स, 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फीसाठी फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सल देण्यात आला आहे. या फोनमध्ये OZO ऑडियो टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे, जेणेकरुन ऑडिओ आणि व्हिडीओ चांगल्या प्रकारे रेकॉर्ड करता येईल.

आता Offline करु शकता Aadhar Verification, वाचा संपूर्ण प्रोसेस

Nokia X100 ची काय आहे किंमत -

Nokia X100 ची किंमत 252 डॉलर म्हणजे भारतीय रुपयानुसार जवळपास 18 हजार रुपये आहे. हा फोन अमेरिकेत 19 नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. हा फोन विशेषत: USA साठी बनवण्यात आला असून मेट्रो टी-मोबाइल आणि मेट्रो नेटवर्क कॅरियर्स माध्यमातून उपलब्ध होईल. सध्या हा फोन केवळ अमेरिकी बाजारात लाँच करण्यात आला असून इतर देशात कधीपर्यंत लाँच केला जाईल याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

First published:
top videos

    Tags: Smartphone