हाइक लाँच करतंय ई-वॉलेट अॅप

हाइक लाँच करतंय ई-वॉलेट अॅप

भारतीय मेसेजिंग अॅप हाइकने गुरुवारी इलेक्ट्रॉनिक पेमेंट वॉलेट लाँच केलंय. हाइकचा ई-वॉलेट हा भारतातील पहिला मेसेजिंग अॅप आहे.

  • Share this:

22 जून : भारतीय मेसेजिंग अॅप हाइकने गुरुवारी इलेक्ट्रॉनिक पेमेंट वॉलेट लाँच केलंय.  हाइकचा ई-वॉलेट हा भारतातील पहिला मेसेजिंग अॅप आहे. अलीकडेच टेन्सेंट होल्डिंग्स या कंपनीने चीनमध्ये या ई-वॉलेटची सर्विस सुरू केली होती. 'वॉलेट टू वॉलेट' ट्रांसफर आणि  बिल पेमेंट या व्यतिरिक्त हाइक 'ब्लू पॅकेट्स' पाठवण्याची सुविधासुद्धा देत आहे. हे फिचर वीचॅटच्या रेड पॅकेट्स सारखंच आहे.

हाइकचे युजर्स या अॅपद्वारे दुसऱ्या युजर्सना आणि बँक अकाऊंटमध्ये पैसे ट्रांसफर करू शकतात. हाइकची ही सर्विस यूपीआय ( यूनायटेड पेमेंट्स इंटरफेस)  सिस्टिमवर काम करणार आहे. हाइकचे चीफ एग्जीकेटीव्ह केविन मित्तल यांनी एजेंसी रॉयटर्सशी बोलताना असे सांगितले की ई-वॉलेट ही सर्विस टेन्सेंटच्या वीचॅटशी प्रेरित होऊन सुरू करत आहोत.

यूपीआय सिस्टिमच्या माध्यमातून मनी ट्रांसफरसाठी हाइकने यस बँकेशी पार्टनरशिप केली आहे. सध्या अशी चर्चा आहे की फेसबुकचं मेसेजिंग अॅप वाट्सअॅपसुद्धा या वर्षाच्या शेवटी पेमेंट फॅसिलीटीची सुरूवात करणार आहे. हाइकचे भरतात 100 मिलियन रजिस्टर्ड युजर्स आहेत. हे डिसेंबर 2012 मध्ये लाँच केलं होतं.

भारती सॉफ्टबँक, टेन्सेंट आणि टायगर ग्लोबल या कंपनीने यामध्ये 260 मिलियन डॉलरची इन्व्हेस्टमेंट केली आहे. हाइकच ई-वॉलेट ऍप  हे जपानची सॉफ्टबँक आणि भारती एंटरप्राइजेजच जॉइन्ट वेंचर आहे.

First published: June 22, 2017, 5:17 PM IST

ताज्या बातम्या