मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Smartphone खरेदी करणं आता आणखी महाग होणार; या कारणामुळे वाढणार किमती

Smartphone खरेदी करणं आता आणखी महाग होणार; या कारणामुळे वाढणार किमती

येणाऱ्या काही दिवसांत स्मार्टफोन (Smartphone) खरेदी करणं महाग पडू शकतं. फोन तयार करण्यासाठी लागणाऱ्या घटकांच्या (Phone Component) किमतीत वाढ झाल्याने याचा थेट परिणाम स्मार्टफोनच्या किमतीवर होत आहे.

येणाऱ्या काही दिवसांत स्मार्टफोन (Smartphone) खरेदी करणं महाग पडू शकतं. फोन तयार करण्यासाठी लागणाऱ्या घटकांच्या (Phone Component) किमतीत वाढ झाल्याने याचा थेट परिणाम स्मार्टफोनच्या किमतीवर होत आहे.

येणाऱ्या काही दिवसांत स्मार्टफोन (Smartphone) खरेदी करणं महाग पडू शकतं. फोन तयार करण्यासाठी लागणाऱ्या घटकांच्या (Phone Component) किमतीत वाढ झाल्याने याचा थेट परिणाम स्मार्टफोनच्या किमतीवर होत आहे.

नवी दिल्ली, 12 मे : मोबाईल कंपन्यांनी (Mobile companies)आपल्या-आपल्या फोनच्या किमतीत वाढ (Price Hike) करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत स्मार्टफोन (Smartphone) खरेदी करणं महाग पडू शकतं. फोन तयार करण्यासाठी लागणाऱ्या घटकांच्या (Phone Component) किमतीत वाढ झाल्याने याचा थेट परिणाम स्मार्टफोनच्या किमतीवर होत आहे. एकीकडे मोबाईल कंपोनेंट्सच्या वाढत्या किंमती आणि दुसरीकडे जगभरात होणारी चिपची कमतरता (shortage of chip) मोबाईल कंपन्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

स्मार्टफोन निर्माता शाओमी (Xiomi) इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मार्टफोन बनवण्यासाठी लागणारे डिस्प्ले पॅनल, बॅक पॅनल, बॅटरी पॅक यासारख्या गोष्टींच्या किंमती गेल्या काही महिन्यात वाढल्या आहे. त्यामुळे याचा परिणाम मोबाईल फोनच्या किंमतीवर होताना दिसतो आहे.

चीननंतर भारत जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरर आहे. मोबाईल फोनच्या वाढत्या किंमतीदरम्यान शाओमी कंपनीने, ते कमी किंमतीच्या स्मार्टफोनचे दर वाढणार नसल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या कोणत्याही प्रोडक्टवर 5 टक्क्यांहून अधिक नफा कमावण्याची योजना नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

(वाचा - अलर्ट! Review पाहून Online Shopping करताय; मग आधी हे वाचाच)

परंतु, एका मोबाईल फोन डीलरने, गेल्या काही आठवड्यात Xiaomi note 10 फोनची किंमत जवळपास 500 रुपयांनी वाढली असल्याचं सांगितलं आहे. चीननंतर भारत जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरर आहे, परंतु यासाठी तो चिप किंवा सेमीकंडक्टरच्या आयातीवर निर्भर आहे.

जगभरात सेमीकंडक्टरचा सर्वात मोठा मॅन्युफॅक्चरर तायवान असून तो वाढती मागणी पूर्ण करू शकत नसल्याची माहिती आहे. सध्या चिपची मोठी कमतरता असताना 5G टेक्नोलॉजी आल्यानंतर ही मागणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. टेक्नोलॉजी मार्केट रिसर्च फर्म काउंटरपॉईंट रिसर्चने, सध्याची परिस्थिती पाहता, जुन्या मॉडेल्सच्या किंमती 4 ते 5 टक्क्यांनी वाढवल्या जातील, असं सांगितलं आहे.

(वाचा - या राज्यात दारुची ऑनलाईन डिलीव्हरी सुरू होताच ऑर्डर्सचा भडीमार,तासाभरात Appक्रॅश)

सॅमसंगनेही एका वार्षिक शेयरहोल्डर्स मीटिंगमध्ये चिपच्या कमतरतेबाबत माहिती दिली होती. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये देशात स्मार्टफोनच्या 3.8 कोटीहून अधिक शिपमेंट नोंदवण्यात आल्या होत्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या कहरामुळे येणाऱ्या काळात स्मार्टफोनच्या किंमतीत वाढीसह, विक्रीत कमी येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

First published:

Tags: Mobile Phone, Smartphone, Tech news