नवी दिल्ली, 4 एप्रिल : सध्याच्या डिजीटल जगात जवळपास सर्वच कामं ऑनलाइन केली जातात. लहान-मोठी कामं एका क्लिकवर ऑनलाइन केली जातात. एकीकडे ऑनलाइन ट्रान्झेक्शनमध्ये वाढ होत असताना दुसरीकडे ऑनलाइन फ्रॉड
(Online Fraud), सायबर क्राइमच्या
(Cyber Crime) घटनांमध्येही वाढ होत आहे. ऑनलाइन झालेली एक लहानशी चूकही युजरचं मोठं नुकसान करू शकते. जितकी कामं ऑनलाइन सोपी झाली आहेत, तितकी फ्रॉडची प्रकरणंही वाढली आहेत. त्यामुळे काही गोष्टींकडे लक्ष देणं, काही गोष्टी माहित असणं अतिशय गरजेचं आहे.
स्क्रिन शेअरिंग App -
अनेकदा सायबर फ्रॉडस्टर्स कस्टमर सर्विसमधून बोलत असल्याचं सांगत स्क्रिन शेअरिंग App डाउनलोड करण्यासाठी सांगतात. त्यानंतर स्क्रिन पिन मागून युजरच्या मोबााइल किंवा कंप्यूटरचा अॅक्सेस मिळवतात आणि डिव्हाइसची संपूर्ण आवश्यक माहिती चोरी होते. त्यामुळे कोणतीही फोनवर एखादं App डाउनलोड करण्यासाठी सांगितल्यास ते करू नका.
UPI PIN -
UPI पिनद्वारे होणाऱ्या फ्रॉडमध्ये सतत वाढ होत आहे. अनेकजण पेमेंट करण्यासाठी UPI चा वापर करतात. युजरला संपूर्ण माहिती नसते आणि फ्रॉडस्टर्स ऑनलाइन सेल्स प्लॅटफॉर्म असल्याचा दावा करुन फोनवर लिंक पाठवतात आणि UPI पिन टाकण्यास सांगतात. त्यानंतर लिंकवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण अॅक्सेस समोरच्या व्यक्तीकडे जातो आणि अकाउंटमधून पैसे कट होतात.
वेबसाइट क्लोन -
अनेकदा फ्रॉडस्टर्स मोठ्या कंपनीशी मिळती-जुळती सेम दिसणारी वेबसाइट बनवतात. युजर खरी वेबसाइट समजून तुमचे पर्सनल डिटेल्स त्यात दिले जातात. त्यानंतर पुढे ऑनलाइन फ्रॉड केला जातो.
QR Code स्कॅन -
अनेकदा मेसेजवर लिंक पाठवली जाते. लिंकवर क्लिक केल्यानंतर QR कोडकडे रिडायरेक्ट केलं जातं. हा कोड स्कॅन केल्यानंतर फ्रॉड करणाऱ्यांना तुमचा पैसे घेण्याचा अॅक्सेस मिळतो आणि अकाउंट खाली केलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.