नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : दिवाळीपूर्वी अनेक वाहन कंपन्या आपल्या गाड्यांचे नवे मॉडेल लाँच करत आहेत. हीरो इलेक्ट्रिकनेही (Hero Electric) आपली इलेक्ट्रिक स्कूटर (Electric scooter) बाजारात आणली आहे. ही गाडी एकदा चार्ज केल्यानंतर 200 किमीहून अधिक Average देते. हिरोच्या या Hero Nyx-HX स्कूटरची दिल्ली शोरूममध्ये सुरूवातीची किंमत 64 हजार 640 रुपये आहे.
Hero Electric ने Nyx-HX स्कूटर कमर्शियल वापराच्यादृष्टीने डिजाइन केली आहे. याद्वारे खाण्या-पिण्याच्या वस्तूंची डिलीव्हरी करता येऊ शकते, तसंच वजनदार सामानही घेऊन जाता येऊ शकतं. हीरोच्या या नव्या इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज एकदा चार्ज केल्यानंतर 82 किलोमीटर ते 210 किलोमीटर आहे. म्हणजे, स्कूटरचं सुरुवातीचं वेरिएंट फुल चार्जवर 82 किलोमीटरपर्यंत चालेल. तर टॉप वेरिएंट 210 किलोमीटरपर्यंत चालेल.
(वाचा - फाटलेल्या नोटांबाबत RBI कडून गाईडलाईन्स जारी; या नोटा बदलल्या जात नाहीत)
Hero Electric Nyx-HX स्पेसिफिकेशन्स -
हीरो इलेक्ट्रिकने दिलेल्या माहितीनुसार, युजर्स आपल्या बिजनेसच्या हिशोबानुसार, या स्कूटरला कस्टमाइज करू शकतात. कंपनीने स्कूटरला कस्टमाइज करण्यासाठी आइस बॉक्स आणि स्प्लिट सीट्सचा ऑप्शन दिला आहे. मार्केटमध्ये या इलेक्ट्रिक स्कूटरची तुलना बजाजच्या इलेक्ट्रिक स्कूटर चेतकशी होईल. ज्याची सुरूवातीची किंमत एक लाख रुपये आहे.
(वाचा - मोठा निर्णय : सरकारकडून मोटर vehicle अॅक्टमध्ये बदल, असा होणार परिणाम)
या स्कूटरमध्ये ब्लूटूथ इंटरफेसद्वारे ऑन-डिमांड कनेक्टिव्हिटीसाठी चार लेवल मिळणार आहेत. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरला ट्रॅक करण्याचीही सुविधा दिली आहे. या ई-स्कूटरमद्ये 0.6 kW इलेक्ट्रिक मोटर आहे. स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 42 किलोमीटर आहे. यात 1.536 kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे.