Home /News /technology /

बाईकचा मायलेज वाढवण्यासाठी 'हे' 7 उत्तम मार्ग आहेत, खास तुमच्यासाठी सोप्या टिप्स

बाईकचा मायलेज वाढवण्यासाठी 'हे' 7 उत्तम मार्ग आहेत, खास तुमच्यासाठी सोप्या टिप्स

बाईकची व्यवस्थित काळजी घेऊन तुम्ही तिचे मायलेज वाढवू (increase mileage) शकता. यासाठी टीव्हीएस (TVS) मोटर्सने खास टिप्स दिल्या आहेत. त्या वापरल्यास नक्कीच तुमची बाईक चांगले मायलेज देईल.

नवी दिल्ली, 24 जानेवारी: पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत (Petrol and diesel prices) लागोपाठ वाढ होत आहे. त्यातही बाईक (bike) कमी मायलेज देत असेल तर ती चालवणं जास्त महाग होते. तुम्हीही या समस्येचा सामना करत असाल, तर आम्ही तुम्हाला आज काही खास टिप्स (bike mileage tips) देत आहोत. ज्या वापरून बाईक चालवताना तुम्ही तिचे मायलेज वाढवू शकता. झी बिझनेस ने याबाबत वृत्त दिलंय. कोणत्याही बाईकचे मायलेज चांगले असेल तर तुम्हाला फायदाच होतो. कारण त्यामुळे तुमच्या पैशाची बचत (saves money) होते. पण मायलेज कमी झाले तर तुमचा खर्च वाढतो. पण बाईकची व्यवस्थित काळजी घेऊन तुम्ही तिचे मायलेज वाढवू (increase mileage) शकता. यासाठी टीव्हीएस (TVS) मोटर्सने खास टिप्स दिल्या आहेत. त्या वापरल्यास नक्कीच तुमची बाईक चांगले मायलेज देईल. या टिप्स नेमक्या काय आहेत, त्या आपण पाहूयात. 1. टायर्स हे तुमची बाईक आणि रस्त्याचा पहिला संबंध प्रस्थापित करतात. त्यामुळे टायर्सची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. टायरमधील हवेचा दाब योग्य ठेवा. तसेच योग्य वेळी टायर बदलणं महत्वाचं आहे. 2. तुम्हाला एखाद्या ग्रँड प्रिक्स रेसरप्रमाणे बाईक चालवण्याची सवय असेल, तर ही सवय वेळीच बदला. कारण अशा पद्धतीने गाडी चालवल्यामुळे तिच्या मायलेजवर विपरित परिणाम होतो. त्यामुळे इंजिनही खराब होऊ शकते. 3. अनेकांना क्लच आणि ब्रेक लिव्हरवर एक किंवा दोन बोटं ठेवून गाडी चालवण्याची सवय असते. काही जण मागील ब्रेक पेडलवर उजवा पाय ठेवत बाईक चालवतात. यामुळे रिअॅक्शन टाइम कमी होतो. अशा प्रकारे पाय ठेऊन बाईक चालवणे ही वाईट गोष्ट नाही. पण असे करत असताना, काही जण गरज नसताना क्लच आणि ब्रेक ऑपरेट करतात. क्लच गरज नसताना वापरू नये. यामुळे गाडी मायलेज चांगले देईल. 4.बाईकचा मेंटेंनन्स ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. अन्यथा तिचे इंजिन नीट काम करणार नाही. बाईकचे एअर फिल्टर नेहमी स्वच्छ ठेवा. तसेच बाईकच्या स्पार्क प्लगला आवश्यक करंट मिळत असून तो कार्बन फ्री असल्याची खात्री करा. 5. तुमची बाईक नेहमी स्वच्छ ठेवा. बाईक स्वच्छ असल्यामुळे तिच्या वेगाला कोणताही अडथळा येत नाही, आणि अनावश्यक इंधन खर्चात बचत होते. तुम्ही तुमची बाईक चिखलात चालवली असेल, तर शक्य तितक्या लवकर त्यावरील चिखल काढून टाका. जर तुम्ही चिखल कोरडा होऊ दिला, तर तुमची बाईक गंजण्याचा धोका अधिक वाढतो. कारण चिखल प्रत्येक घटकातून लुब्रिकेंट बाहेर काढेल आणि घर्षण वाढवेल. ज्यामुळे इंजिनला पाहिजे त्यापेक्षा जास्त काम करावे लागेल. साहजिकच याचा परिणाम गाडीच्या मायलेजवर होईल. 6. बाईकमधील चेन, इंजिन आणि आवश्यक तेथे ऑयलिंग वेळोवेळी करा. पुरेशा प्रमाणात लुब्रिकेंट असल्याने इंजिन,चेन इत्यादींचे जास्त घर्षण होत नाही. त्यामुळे बाईकचे मायलेज सुधारते. जर बाईकला डिस्क ब्रेक असतील, तर इंजिन ऑइल, कूलिंग फ्लुइड आणि ब्रेक ऑइल आदींची लेव्हल योग्य ठेवा. 7. तुम्ही बाईकवर एक्स्ट्रा लोड टाकला, तर साहजिकच यामुळे इंजिनची काम करण्याची क्षमता वाढेल. त्यामुळे बाईकला वेग घेण्यासाठी अधिक इंधन लागेल. बाईकवर सातत्याने एक्स्ट्रा लोड टाकत राहिलात, तर ते बाईकची इकॉनॉमी फिगर बिघडते. त्यामुळे बाइकवर एक्स्ट्रा लोड टाकू नका. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे अगोदरच वाहनचालकांचा खर्च वाढला आहे. त्यातच गाडीने जर योग्य मायलेज दिले नाही, तर इंधन जास्त लागते व त्यामुळे खर्चही वाढतो. त्यामुळे मायलेज वाढवण्यासाठी काही सोप्या टिप्स अंमलात आणणे हे वाहनचालकांना फायद्याचे आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Bike riding

पुढील बातम्या