मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Aadhar Card मध्ये अपडेट करण्यास समस्या येतेय? इथे करा तक्रार, एका कॉलवर सोडवली जाईल समस्या

Aadhar Card मध्ये अपडेट करण्यास समस्या येतेय? इथे करा तक्रार, एका कॉलवर सोडवली जाईल समस्या

काही वेळा आधार कार्डवरील तपशीलात बदल करण्याची गरज भासते. मात्र यासाठी कोणी तुमच्याकडे पैशांची मागणी करत असेल किंवा माहिती अपडेट करण्यात तुम्हाला अडचण येत असल्यास केवळ एका कॉलद्वारे किंवा ई-मेलद्वारे तक्रार करू शकता.

काही वेळा आधार कार्डवरील तपशीलात बदल करण्याची गरज भासते. मात्र यासाठी कोणी तुमच्याकडे पैशांची मागणी करत असेल किंवा माहिती अपडेट करण्यात तुम्हाला अडचण येत असल्यास केवळ एका कॉलद्वारे किंवा ई-मेलद्वारे तक्रार करू शकता.

काही वेळा आधार कार्डवरील तपशीलात बदल करण्याची गरज भासते. मात्र यासाठी कोणी तुमच्याकडे पैशांची मागणी करत असेल किंवा माहिती अपडेट करण्यात तुम्हाला अडचण येत असल्यास केवळ एका कॉलद्वारे किंवा ई-मेलद्वारे तक्रार करू शकता.

    नवी दिल्ली, 24 जून: आधार कार्ड (Aadhaar Card) आवश्यक सरकारी दस्तऐवज (Government Document) आहे. सर्व सरकारी आणि खासगी ठिकाणी ओळखपत्र म्हणजेच आयडी प्रूफ (ID proof) म्हणून आधार कार्ड आवश्यक असतं. काही वेळा आधार कार्डवरील तपशीलात बदल करण्याची गरज भासते. उदाहरणार्थ पत्ता बदलला, किंवा नावात बदल, मूळ कार्डवर काही चूक झाली असेल, तर ती दुरुस्त करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यातील अनेक बदल आजकाल घरबसल्या ऑनलाईन पद्धतीनं करता येतात. अर्थात सगळ्यांना हे शक्य नसतं तेव्हा आधार केंद्रावर जाऊन हे बदल करता येतात. मात्र यासाठी कोणी तुमच्याकडे पैशांची मागणी करत असेल किंवा माहिती अपडेट करण्यात तुम्हाला अडचण येत असल्यास केवळ एका कॉलद्वारे किंवा ई-मेलद्वारे तक्रार करू शकता. त्यामुळे तुमची अडचण अल्पावधीत दूर होऊ शकते. याबाबतचे वृत्त दिले आहे.

    कॉल करून तक्रार नोंदवण्यासाठी -

    हिंदुस्थान डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, आधारशी संबंधित कोणतीही तक्रार करण्यासाठी तुम्ही 1947 या क्रमांकावर कॉल करू शकता. हिंदी, इंग्रजी, तेलगू, कन्नड, तामिळ, मल्याळम, पंजाबी, गुजराती, मराठी, उडिया, बंगाली, आसामी आणि उर्दू अशा 12 भाषांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे.

    वेबसाइटवर तक्रार करण्यासाठी -

    - सर्व प्रथम यूआयडीएआय https://resident.uidai.gov.in/ च्या अधिकृत वेबसाइटवर जा.

    - आता इथे Contact आणि Support वर क्लिक करा.

    - यानंतर तुमचा 14 अंकी नोंदणी क्रमांक भरा.

    - यानंतर दिवस, महिना आणि वर्षासह वेळही टाकावी लागेल.

    (वाचा - Ration Card : स्वस्त दरातील धान्य मिळण्यास समस्या येतेय? या नंबरवर करा तक्रार)

    - आता नाव, ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक द्यावा लागेल.

    - लोकेशन टॅबमध्ये पिन क्रमांक टाकून, लिस्टमधून गाव किंवा शहराचं नाव निवडावं लागेल.

    - यानंतर तक्रारीचा प्रकार, त्याची श्रेणी आणि समस्या नोंदवावी लागेल.

    - शेवटी वेबसाईटवर असलेला सिक्युरिटी कोड टाकावा लागेल.

    - ही सर्व माहिती सबमिट करताच तक्रार नोंदविली जाईल.

    (वाचा - पुरुषांच्या तुलनेत भारतीय महिलांना नोकरी शोधण्यात अधिक समस्या; Linkedin सर्व्हेत मोठा खुलासा)

    ई-मेलद्वारेही तक्रार करणं शक्य -

    तुम्हाला ई-मेलद्वारे तक्रार करायची असेल, तर help@uidai.gov.in वर आपली तक्रार लिहून पाठवावी लागेल. यूआयडीएआयचे अधिकारी वेळोवेळी हे मेल तपासून लोकांच्या तक्रारी दूर करतात. ते आपल्या ई-मेलला प्रतिसाद देतात आणि समस्या दूर करतात. त्यामुळे आता तुम्हाला आधारकार्ड बाबत कोणतीही समस्या असेल तर एका फोनद्वारे किंवा ईमेलद्वारे तुम्ही ती दूर करू शकता.

    First published:

    Tags: Aadhar card, Aadhar card link