मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Har Ghar Tiranga: डिजिटल तिरंग्यात दिसेल तुमचा फोटो, करावं लागेल हे छोटं काम

Har Ghar Tiranga: डिजिटल तिरंग्यात दिसेल तुमचा फोटो, करावं लागेल हे छोटं काम

Har Ghar Tiranga: डिजिटल तिरंग्यात दिसेल तुमचा फोटो, करावं लागेल हे छोटं काम

Har Ghar Tiranga: डिजिटल तिरंग्यात दिसेल तुमचा फोटो, करावं लागेल हे छोटं काम

Har Ghar Tiranga: हर घर तिरंगा मोहिमेत लोक उत्स्फुर्तपणे सहभागी होत आहेत. तुम्हीही या मोहिमेचा भाग झाला असाल, तर तुम्ही त्याचं प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता. याशिवाय तुम्ही तिरंग्यासोबत तुमचा सेल्फीही अपलोड करू शकता.

    मुंबई, 14 ऑगस्ट : हर घर तिरंगा मोहिमेत लोक उत्स्फुर्तपणे सहभागी होत आहेत. तुम्हीही या मोहिमेचा भाग झाला असाल, तर तुम्ही त्याचं प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता. याशिवाय तुम्ही तिरंग्यासोबत तुमचा सेल्फीही अपलोड करू शकता. तो तिरंग्यात दाखवला जाईल. त्याची संपूर्ण पद्धत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं देश यंदा ‘आझादी का अमृत महोत्सव’ (Azadi ka Amrit Mahotsav) साजरा करत आहे. यामध्ये सरकार ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) मोहीमही राबवत आहे. या मोहिमेत लोकांना घरोघरी तिरंगा फडकावायचा आहे. यासाठी सरकारनं खास वेबसाईटही तयार केली आहे. या वेबसाइटवरून, तुम्ही हर घर तिरंगा अभियानाचा एक भाग बनून त्याचं प्रमाणपत्र देखील डाउनलोड करू शकता. याशिवाय तुम्ही तुमचा सेल्फीही येथे अपलोड करू शकता. तुमच्या तिरंग्यासोबत क्लिक केलेला सेल्फी येथे अपलोड करून तुम्ही डिजिटल तिरंग्यात स्वतःला सामावून घेऊ शकता. असं केल्यामुळं जगभरातील लोक तुमचा तिरंग्यासोबतचा फोटो पाहू शकतात. चला तर मग, अजिबात वेळ न घालवता जाणून घेऊया की त्यासाठी काय करावं लागेल. हेही वाचा: व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवा, देशासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांचे फोटो हा आहे मार्ग- यासाठी तुम्हाला प्रथम तुमचा फोटो किंवा तिरंग्यासोबतचा सेल्फी क्लिक करावा लागेल. फोटोमध्ये तुमचा चेहरा आणि तिरंगा स्पष्टपणे दिसला पाहिजे. यानंतर तुम्हाला harghartiranga.com ही वेबसाइट उघडावी लागेल.  एकदा का तुम्ही वरील वेबसाईटवर गेला की, तुम्हाला Upload Selfie With Flag चा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमच्या तिरंग्यासह सेल्फी अपलोड करावा लागेल. नंतर नाव आणि इतर माहिती भरून सबमिट करा. फोटो अपलोड झाल्यानंतर थोडी प्रतीक्षा करा. चांगले फोटो साईटवर अपलोड केली जातील. वेबसाइटनुसार, आतापर्यंत 2.5 कोटींहून अधिक सेल्फी अपलोड करण्यात आले आहेत. तुम्ही या वेबसाइटवरून हर घर तिरंगा अभियानाचा भाग असल्याचे प्रमाणपत्र देखील डाउनलोड करू शकता. तुम्ही येथे क्लिक करून ही प्रक्रिया वाचू शकता.
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: Independence day

    पुढील बातम्या