Home /News /technology /

झटका! या ई-कॉमर्स साईटच्या 2 कोटी युजर्सचा डेटा लीक; 30 लाख रुपयात विकणार असल्याची माहिती

झटका! या ई-कॉमर्स साईटच्या 2 कोटी युजर्सचा डेटा लीक; 30 लाख रुपयात विकणार असल्याची माहिती

कंपनीने बंगळुरूमध्ये सायबर क्राईम सेल पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सायबर एक्सपर्ट्सकडून पुढील तपास सुरू आहे.

  नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : ग्रॉसरी ई-कॉमर्स कंपनी बिग बास्केटच्या यूजर्सचा डेटा चोरी झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सायबर इंटेलिजन्स कंपनी Cyble ने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 2 कोटी युजर्सचा डेटा लीक झाला आहे. एक हॅकर Big Basket शी निगडीत डेटा 30 लाख रुपयात विकणार असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीने बंगळुरूमध्ये सायबर क्राईम सेल पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सायबर एक्सपर्ट्सकडून पुढील तपास सुरू आहे. Cyble च्या रिसर्च टीमची माहिती - Cyble ने आपल्या एका ब्लॉगमध्ये लिहिलंय की, आमच्या रिसर्च टीमला, वेब मॉनिटरिंगमध्ये आढळलं की, सायबर क्राईम मार्केटमध्ये Big Basket चा डेटा 40000 डॉलरमध्ये विकला जात आहे. या डेटा बेसची फाईल जवळपास 15GB असून, ज्यात जवळपास 2 कोटी यूजर्सचा डेटा आहे. (वाचा - अलर्ट! डेबिट, क्रेडिट कार्डाबाबत अशाप्रकारे कॉल आल्यास वेळीच व्हा सावधान, अन्यथा) पर्सनल डिटेल्स चोरी - या डेटामध्ये नाव, ईमेल आयडी, पासवर्ड, कॉन्टॅक्ट नंबर, पत्ता, जन्मतारीख, ठिकाण, आयपी ऍड्रेस सामील आहे. Cyble ने उल्लेख केलेला पासवर्ड म्हणजे वन-टाईम पासवर्ड, ज्यावेळी लॉग-इन केलं जातं आणि प्रत्येकवेळी पासवर्ड बदलला जातो, त्यावेळी SMS द्वारे मिळणारा वन-टाईम पासवर्ड.

  (वाचा - तुमच्या कंप्यूटरमध्ये व्हायरस आहे असं सांगत..चोरट्यांकडून तब्बल 8 कोटींची फसवणूक)

  Cyble कडून, डेटा चोरी 30 ऑक्टोबर 2020 रोजी झाल्याचं Big Basket मॅनेजमेंटला सूचित करण्यात आलं आल्याचं सांगितलं आहे. बंगळुरूच्या Big Basket मध्ये Alibaba Group, Mirae Asset-Naver Asia Growth Fund आणि UK सरकारच्या CDC ग्रुपचा पैसा लावण्यात आला आहे

  (वाचा - Whatsapp Pay in India : अशाप्रकारे बनवा खातं, व्यवहार करणं अधिक सुलभ)

  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Cyber crime

  पुढील बातम्या