नवी दिल्ली, 8 मार्च : सध्याच्या इंटरनेटच्या
(Internet) जगात अनेक जण आपल्या लॅपटॉप, मोबाइलवरच ऑनलाइन अनेक कामं पूर्ण करतात. कामांसाठी एखाद्या ऑफिसमध्ये जाण्याऐवजी त्या साइटवर जावून घरबसल्या आवश्यक फॉर्म भरुन कामं केली जातात. बँकिंग व्यवहार ऑनलाइन
(Online Banking) करण्याची पद्धत मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यात कोरोनामुळे यात अधिकच वाढ झाली आहे.
ऑनलाइनमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या असल्या, तरी मोबाइल बँकिंग
(Mobile Banking), इंटरनेट बँकिंगमुळे
(Internet Banking) सायबर अटॅक
(Cyber attack), हॅकिंगच्या
(Hacking) प्रकरणात मोठी वाढ झाली आहे. हॅकर्स, फ्रॉडस्टर्स एखाद्या बँकेच्या, वित्तीय संस्थेच्या किंवा टेलिकॉम कंपन्यांच्या नावे बोलत असल्याचं सांगत लोकांची फसवणूक करत आहेत. अशा अनेक घटना समोर आल्या आहेज, ज्यात KYC
(KYC Fraud), बँकिंग डिटेल्स, आधार-पॅन कार्डच्या नावे फसवणूक केली गेली आहे. अशाप्रकारचे ऑनलाइन धोके पाहता सायबर अटॅक आणि हॅकिंगपासून वाचण्यासाठी सरकार नवी सिक्योर ईमेल सर्विस
(New Secure Email Service) लाँच करण्याची तयारी करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नव्या ईमेल सर्विसमध्ये हॅकिंग, सायबर अटॅकची आधीच माहिती मिळेल. वेळेआधीच माहिती मिळाल्याने पुढे यापासून वाचण्यासाठी तयारी केली जाऊ शकते. या नव्या मेल सर्विसमध्ये सिक्योरिटी, परफॉर्मेन्ससह इतर काही गोष्टी मजबूत करण्याकडे सरकार लक्ष देईल. यात My Dashboard, नेटिव मोबाइल अॅप्लिकेशनसारखे नवे फीचरही असतील.
या नव्या सर्विसची जबाबदारी नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर सर्विसची असेल. या नव्या ईमेल सर्विसमुळे सरकारी कामांसाठी सुरक्षित ईमेल सेवा उपलब्ध होईल. ही सर्विस लाँच झाल्यानंतर सिक्योर कम्यूनिकेशन सिस्टम तयार होईल. तसंच संवेदनशील माहितीच्या व्यवहारांना अतिरिक्त सुरक्षाही मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.