नवी दिल्ली, 12 मे : सरकार तुम्हाला 10,100 रुपये जमा केल्यानंतर 30 लाख रुपये देत आहे, याबाबत सरकारने नोटिफिकेशन जारी केलं असल्याचा मेसेज सध्या समोर आला आहे. भारत सरकार आणि अशोत स्तंभाच चित्र असलेलं नोटिफिकेशन सर्कुलेट होत असून त्यात हा 30 लाखांचा दावा करण्यात आला आहे.
ही रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात आली आहे. परंतु ही रक्कम प्रोसेसमध्ये असल्याने आता तुमच्या अकाउंटमध्ये दिसणार नाही. प्रोसेस पूर्ण करण्यासाठी 10,100 रुपये परमिशन चार्ज भरावा लागेल.
सध्या सायबर फ्रॉडच्या (Cyber Fraud) संख्येत मोठी वाढ झाली आहे. सायबर क्रिमिनल्स दररोज वेगवेगळ्या पद्धतींनी लोकांची फसवणूक (Online Fraud) करत आहेत. सोशल मीडियावर असाच एक सायबर फ्रॉड व्हायरल होत आहे. या फ्रॉडमध्ये अकाउंटमध्ये 30 लाख रुपये जमा केल्याचं सांगितलं जात आहे. परंतु ही संपूर्ण रक्कम मिळवण्यासाठी 10,100 रुपये चार्ज भरावा लागेल असंही सांगितलं जात आहे.
A #Fake letter issued in the name of Govt of India claims that the recipient's account will be debited with Rs 30 Lakhs on payment of Rs 10,100.#PIBFactCheck
▶️Fraudsters impersonate Govt organisations to dupe people of money. ▶️Beware of such fraudulent letters. pic.twitter.com/01ON2Z3cKI — PIB Fact Check (@PIBFactCheck) May 9, 2022
काय आहे सरकारच्या नावाने व्हायरल होणाऱ्या या नोटिफिकेशनचं सत्य -
सरकारी एजेन्सी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो अर्थात PIB ने ट्विट करत या फ्रॉड नोटिफिकेशनबाबत माहिती दिली आहे. PIB Fact Check ने सांगितलं, की हे लेटर पूर्णपणे फेक आहे आणि याचा कोणत्याही सरकारी स्किमशी संबंध नाही. ही सायबर क्रिमिनल्सचं फसवणुकीचं एक जाळं आहे. त्यामुळे तुमच्याकडे असं कोणतंही लेटर आल्यास त्याकडे दुर्लक्ष करा आणि ते कुठेही फॉर्वर्ड किंवा शेअर करू नका. फ्रॉड करणारे फ्रॉडस्टर्स लोकांना फसवण्यासाठी सरकारी लेटरची कॉपी करत आहेत. त्यामुळे तुम्ही चुकूनही या खोट्या स्किममध्ये अडकू नका असं सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cyber crime, Online fraud, PIB