Tiktok आणि Helo या कंपन्यांना सरकारची नोटीस, येऊ शकते बंदी

सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असलेल्या टिकटॉक आणि हॅलो या दोन्ही अ‍ॅप्सना नोटीस पाठवली आहे. या नोटिशीमध्ये सरकारने या कंपन्यांना 21 प्रश्न विचारले आहेत. याची समाधानकारक उत्तरं दिली नाही तर या दोन्हीवर बंदी येऊ शकते.

News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2019 03:47 PM IST

Tiktok आणि Helo या कंपन्यांना सरकारची नोटीस, येऊ शकते बंदी

नवी दिल्ली, 18 जुलै : सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असलेल्या टिकटॉक आणि हॅलो या दोन्ही अ‍ॅप्सना नोटीस पाठवली आहे. या नोटिशीमध्ये सरकारने या कंपन्यांना 21 प्रश्न विचारले आहेत. याची समाधानकारक उत्तरं दिली नाही तर या दोन्हीवर बंदी येऊ शकते. सरकारी अधिकाऱ्यांनीच याबद्दलची माहिती दिली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघांशी जोडलेल्या स्वदेशी जागरण मंच या संस्थेने Tiktok आणि Helo विरुद्ध पंतप्रधानांकडे तक्रार केली आहे. या प्लॅटफॉर्म्सचा उपयोग देशविरोधी कृत्यांसाठी केला जात आहे, असं स्वदेशी जागरण मंच चं म्हणणं आहे. त्यामुळे इलेक्ट्रानिक आणि आयटी मंत्रालयाने याबद्दल Tiktok आणि Helo ला नोटीस पाठवली आहे.

सोलापूरमध्ये पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीला भगदाड? 'हे' 4 नेते युतीच्या वाटेवर

याबद्दल टिकटॉक आणि हॅलो या दोन्ही कंपन्यांशी संपर्क केला तेव्हा दोघांनी संयुक्तपणे पत्रक काढून जाहीर केलं की,6 हजार 500 कोटींची गुंतवणूक करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. तंत्रज्ञानाशी संबंधित पायाभूत संरचना विकसित करण्याचाही आमचा विचार आहे.

टिकटॉक आणि हॅलो या प्लॅटफॉर्म्सचा वापर देशविरोधी कृत्यांसाठी होणार नाही याची त्यांनी हमी द्यावी, असं सरकारने म्हटलं आहे. तुमच्याकडे युजर्सची किती माहिती साठलेली आहे ? हा डेटा कंपनी कुण्या तिसऱ्या व्यक्तीशी शेअर करते का ? असे प्रश्न सरकारने विचारले आहेत.

Loading...

या कंपन्यांची भारतात किती कार्यालयं आहेत आणि किती कर्मचारी यामध्ये काम करतात याबद्दलही सरकारने विचारणा केली आहे. टिकटॉक किंवा हॅलो वर कोणताही वादग्रस्त कंटेंट प्रसारित होऊ नये यासाठीही या कंपन्यांना खबरदारी घ्यावी लागणार आहे.सरकारने विचारलेल्या प्रश्नांची या कंपन्या समाधानकारक उत्तरं देतात का ते आता पाहावं लागेल.

================================================================================================

पुण्यात अवतरला नवा गोल्डन मॅन, दररोज घालतो फक्त 5 किलो सोनं?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2019 03:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...