मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /भारत सरकारकडून पुन्हा 50 Chinese Apps बॅन? पाहा डिटेल्स

भारत सरकारकडून पुन्हा 50 Chinese Apps बॅन? पाहा डिटेल्स

सरकारने देशात आणखी 50 चायनीज स्मार्टफोन अ‍ॅप्सवर (Smartphone Apps) बंदी घातली आहे. 2022 मध्ये चायनीज अ‍ॅपवर बंदी घालण्याची ही पहिलीच कारवाई आहे.

सरकारने देशात आणखी 50 चायनीज स्मार्टफोन अ‍ॅप्सवर (Smartphone Apps) बंदी घातली आहे. 2022 मध्ये चायनीज अ‍ॅपवर बंदी घालण्याची ही पहिलीच कारवाई आहे.

सरकारने देशात आणखी 50 चायनीज स्मार्टफोन अ‍ॅप्सवर (Smartphone Apps) बंदी घातली आहे. 2022 मध्ये चायनीज अ‍ॅपवर बंदी घालण्याची ही पहिलीच कारवाई आहे.

    नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी : भारत आणि चीन संबंधांमधील वाढत्या तणावामुळे सप्टेंबर 2020 मध्ये भारतात पबजी (PUBG) गेमसह इतर अनेक चिनी अ‍ॅप्सवर (Chinese Apps) बंदी (Ban) घालण्यात आली होती. भारताने 2020 पासून 270 चायनीज अ‍ॅप्सवर कारवाई केलेली आहे. भारत सरकारने पुन्हा एकदा अशीच कारवाई केली आहे. सरकारने देशात आणखी 50 चायनीज स्मार्टफोन अ‍ॅप्सवर (Smartphone Apps) बंदी घातली आहे. 2022 मध्ये चायनीज अ‍ॅपवर बंदी घालण्याची ही पहिलीच कारवाई आहे. यावर्षी बॅन करण्यात आलेल्या अ‍ॅप्सची अधिकृत यादी अद्याप उपलब्ध झाली नसली तरी, ईटी नाऊनं (ET Now) या वृत्ताला दुजारो दिला आहे.

    काही दिवसांपूर्वी गॅरेना फ्री फायर नावाचा एक लोकप्रिय स्मार्टफोन गेम, गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरून (Apple App Store) नाहीसा झाला होता. हा गेम भारतातील प्रतिबंधित अ‍ॅप्सच्या नवीन यादीमध्ये समाविष्ट केला गेला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप गेमचे डिस्ट्रिब्युटर गॅरेना इंटरनॅशनलकडून (Garena International) याबाबत कुठलीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच, अ‍ॅपल किंवा गुगलनंही अद्याप स्टोअरवरून हे अ‍ॅप नाहीसं होण्याबाबत कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

    बंदी घातलेल्या अ‍ॅप्सच्या संपूर्ण यादीबद्दल फारच कमी अधिकृत माहिती उपलब्ध झाली आहे. ईटी नाऊच्या अहवालानुसार, बंदी घातलेल्या अ‍ॅप्सच्या नवीन यादीमध्ये बहुतेक अ‍ॅप्सच्या क्लोनचा (Clones) समावेश आहे. ज्या अ‍ॅप्सवर 2020 पासून भारतात बंदी घालण्यात आली होती, अशा अ‍ॅप्सचे हे क्लोन आहेत. प्रतिबंधित अ‍ॅप्सच्या (Banned Apps) यादीमध्ये आणखी 50 अ‍ॅप्सची भर पडल्यानं, प्रतिबंधित अ‍ॅप्सची एकूण संख्या 320च् या आसपास पोहचू शकते.

    हे वाचा - 'हा' शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म आता ShareChat च्या मालकीचा; 60 कोटी डॉलर्सचा करार

    टिकटॉक (TikTok), पबजी (PUBG) मोबाईल, शेअर इट (Share it), यूसी ब्राऊझर (UC Browser) सह अनेक लोकप्रिय अ‍ॅप्सवर भारत सरकारनं यापूर्वीच बंदी घातली होती. 2020 मध्ये भारत आणि चिनी सैन्यादरम्यान सीमेवर झालेल्या चकमकीनंतर चायनीज अ‍ॅप्सवर कारवाई केली होती. चायनीज अ‍ॅप्स भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका निर्माण करू शकतात, असं कारण देऊन बंदीची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर गेम डेव्हलपर (Game Developer) कंपनी असलेल्या क्राफ्टॉननं (Krafton) चायनीज पार्टनर्ससोबत भागीदारी तोडून भारतात यशस्वी पुनरागमन केलं. मात्र, टिकटॉकला हे शक्य झालं नाही. भारतात टिकटॉकवर अद्यापदेखील बंदीच आहे.

    आता नव्यानं बंदी घातलेल्या अ‍ॅप्समध्ये बहुतेक अ‍ॅप क्लोन्सचा समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, जोपर्यंत सरकारकडून अधिकृतपणे प्रतिबंधित अ‍ॅप्सची यादी जाहीर होणार नाही तोपर्यंत फक्त शक्यतांवर अवलंबून रहावं लागणार आहे.

    First published:
    top videos

      Tags: Apps, Tech news