Home /News /technology /

पुढच्या वर्षी गुगल हँगआऊट होणार बंद; युझर्ससाठी गुगलने दिला 'हा' पर्याय

पुढच्या वर्षी गुगल हँगआऊट होणार बंद; युझर्ससाठी गुगलने दिला 'हा' पर्याय

2021च्या मध्यात गुगल हँगआऊट (google hangouts) बंद होणार आहे. पण चिंता करू नका, हँगआऊट बंद होणार असलं तरी गुगलने आपल्या युझर्सना नवा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

    मुंबई, 17 ऑक्टोबर: गुगल हँगआऊट (Google Hangouts)  हे माध्यम 2021मध्ये बंद होणार आहे. त्यामुळे गुगल हँगआऊटच्या  युझर्सना गुगल चॅटवर (Google Chat) स्थलांतरित केलं जाईल. सध्या गुगल वर्कस्पेस वापरणाऱ्यांना गुगल चॅट वापरता येतं. पण लवकरच ते सामान्य ग्राहकांनाही उपलब्ध करून दिलं जाईल, असं गुगलनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. हँगआऊटवरून चॅटवर जाण्याच्या प्रक्रियेत युझर्सचे संपर्क, सेव्ह डाटा, आणि अन्य सेवा या आपोआप चॅटवर स्थलांतरित होणार आहेत. याचा अर्थ गुगल हँगआऊटशी इंटिग्रेट केलेले प्रोग्राम एकतर बंद होतील किंवा चॅट आणि मीट यापैकी कोणत्यातरी सेवात जोडले जातील. गुगलच्या सेवेमध्ये हा जो बदल होणार आहे, हा नेमका कधी होईल हे अजून स्पष्ट झालेलं नाही. यापूर्वीही गुगलने हँगआऊट हा प्लॅटफॉर्म चॅट किंवा मिटमध्ये जोडला जाईल असं जाहीर केलं होतं. गुगल चॅटचे एक वेगळे अ‍ॅप असेल, त्यामध्ये जीमेल आणि जीमेल वेब क्लायंट हे विभाग असतील,असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. सध्या गुगल वर्कस्पेस वापरणाऱ्यांना जीमेलमध्ये गुगल चॅट वापरता येतं. या बदलामुळे सध्या गुगल हँगआऊट वापरणाऱ्यांना इन्बॉक्समध्ये मेसेज पाठवण्याबरोबरच इमोजी, फास्ट सर्चिंग, सजेस्टेड रिप्लाय या सेवाही वापरता येत आहेत. तसंच युझर्सना सुधारित सायबर सुरक्षाही मिळणार आहे. हँगआऊटमध्ये असलेलं गुगल एफआय हे गुगल मेसेजमध्ये उपलब्ध असेल. एफआय वापरणारे युझर्स वेबवरील व्हॉइस मेसेज तपासू शकतील आणि व्हॉइस कॉल करू शकतील. शिवाय फोन बंद असतानाही इतर डिव्हाइसमधून मेसेज आणि चॅट या ग्राहकांना पाहता येतील. हा बदल येत्या महिनाभरात सुरू होणार आहे. गुगल व्हॉइस वापरणाऱ्यांना विनामूल्य कॉलिंग करण्यासाठी स्टँडअलोन व्हॉइस अ‍ॅप वापरावं लागेल. हँगआऊट प्लॅटफॉर्मवरील इतर सेवाही या वर्षी बंद होतील, असं गुगलनं म्हटलं आहे.  युएई आणि अमेरिकेत लागू झालेल्या नव्या टेलिकम्युनिकेशन्स नियमांमुळे या महिन्यातच तिथल्या हँगआऊट सेवेतील कॉलचा पर्याय बंद करण्यात येणार आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Google, Technology

    पुढील बातम्या