• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • YouTube वापरकर्त्यांना Google ने केले सावधान: कशापद्धतीने केले जात आहे यूटयुब अकाउंटस हॅक?

YouTube वापरकर्त्यांना Google ने केले सावधान: कशापद्धतीने केले जात आहे यूटयुब अकाउंटस हॅक?

YouTube

YouTube

सायबर गुन्हेगारांनी (Cyber Criminal) सध्या युट्युब अकाउंटसला आपलं लक्ष्य केलं आहे. कशा पध्दतीनं सायबर गुन्हेगार यूटयुब अकाउंटस हॅक (Hack) करत आहेत, याची माहिती खुद्द गुगलने (Google) फिशिंग कॅम्पेनच्या माध्यमातून दिली आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर:  सध्याच्या काळात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platform) हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर हे अॅप्स वापरणाऱ्या युजर्सची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. यात युट्युब (Youtube) हा विशेष लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. युट्युबच्या माध्यमातून युजर्स विविध विषयांवरील व्हिडीओ (Video) शेअर करत असतात. अर्थात त्याला मिळणारा प्रतिसादही मोठा असतो. मनोरंजन किंवा माहिती देणं यासोबतच अनेक युजर्स युट्युबच्या माध्यमातून चांगली कमाई देखील करतात. तुम्ही देखील युट्युब वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण सायबर गुन्हेगारांनी (Cyber Criminal) सध्या युट्युब अकाउंटसला आपलं लक्ष्य केलं आहे. कशा पध्दतीनं सायबर गुन्हेगार यूटयुब अकाउंटस हॅक (Hack) करत आहेत, याची माहिती खुद्द गुगलने (Google) फिशिंग कॅम्पेनच्या माध्यमातून दिली आहे. याविषयीचं वृत्त `आज तक`ने दिले आहे. फिशिंग हल्ले हे विविध हॅकर्सच्या माध्यमातून केले जात आहेत. या हल्ल्यांच्या माध्यमातून हॅकर्स केवळ युट्युबर्सचं अकाउंट हॅक करत नसून, युजर्सच्या कॉम्प्युटरमध्ये मालवेअर (Malware) इन्स्टॉल करत असल्याचं गुगलनं म्हटलं आहे. कॉम्प्युटरला मालवेअर च्या माध्यमातून टार्गेट करून हॅकर्स प्रत्यक्षात मात्र युजर्सच्या अन्य अकाउंटचे लॉगिन हस्तगत करत होते. मात्र आता युट्युबर्सला खोट्या कॅम्पेनिंगच्या जाळ्यात अडकवून हॅकिंग केले जात आहे. युट्युबर्सला लक्ष्य करण्यासाठी 15 हजार फेक अकाउंट आणि 10 लाखांहून अधिक मेसेज हॅकर्सनं तयार केले असल्याचं आढळून आलं आहे. यापूर्वी हॅकर्स कॅम्पेनच्या माध्यमातून युट्युब अकाउंट हॅक करत होते. यासाठी हॅकर्सनं विशेष कॅम्पेनही तयार केले होते. हॅकर्सनं युट्युबर्स साठी व्हीपीएन (VPN) प्रमोट करण्यासाठी, अॅंटी व्हायरस प्रमोट करण्यासाठी किंवा एखादं सॉफ्टवेअर त्यांच्या चॅनेलच्या माध्यमातून प्रमोट करण्यासाठी म्हणजेच त्याची जाहिरात (Advertisement) करण्यासाठी युट्युबर्ससोबत डिल करत. अशा वेळी हॅकर्स युट्युबर्सशी विक्रेता किंवा जाहिरातींसाठी संपर्क करत. जर क्रिएटर्सनं हे डिल मान्य केलं तर हॅकर्स त्यांना एक लिंक पाठवत. मात्र या लिंकवर क्लिक केल्यानंतर युजर्सचा कॉम्प्युटर मालवेअरने इन्फेक्ट केला जात. हा मालवेअर अशा पध्दतीनं इन्स्टॉल केला जात की त्यामुळे युजर्सच्या कॉम्प्युटरमधील कुकीज (Cookies) आणि पासवर्ड (Password) चोरी करणं शक्य होत असे. एकदा युट्युब युजर्सच्या कुकीज हॅकर्सच्या ताब्यात गेल्या की तो सर्व अकाउंट ताब्यात घेत असे. गुगलच्या युट्युबसह अन्य सेवा जीमेलच्या माध्यमातून अॅक्सेस होतात. त्यामुळे एकदा जीमेलवर ताबा मिळवला की गुगलच्या अन्य सेवांचा अक्सेस हॅकर्सला सहजपणे मिळतो. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, एखाद्याचं युट्युब अकाउंट हॅक केल्यानंतर हॅकर्स ते लाखो रुपयांना विकतात. अर्थात अकाउंटची किंमत त्याच्या सब्स्क्राईबवर ठरवली जाते. हॅकर्सने हॅकिंगसाठी तयार केलेल्या जाहिरातींचा स्क्रिनशॉटही पोस्ट केला आहे. अशा पद्धतीच्या जाहिरातींच्या कॅम्पेन एक्सेप्ट करण्यापूर्वी युट्युबरनं त्याची पडताळणी करावी. घाईघाईत अपरिचित लिंकवर क्लिक करू नये, अन्यथा तुमचे यूट्यूब अकाउंट हॅक होऊ शकते, असं गुगलनं म्हटलं आहे.
First published: