• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • तुमची त्वचा पाहूनच सांगेल काय आहे समस्या; Google चं भन्नाट हेल्थ टूल

तुमची त्वचा पाहूनच सांगेल काय आहे समस्या; Google चं भन्नाट हेल्थ टूल

हे टूल कोणत्याही समस्येचं निदान करण्यासाठी नसल्याचं Google ने स्पष्ट केलं आहे. म्हणजेच समस्येवर केवळ डॉक्टरचं उपचार करतील. पण या टूलमुळे स्किनमध्ये काय समस्या आहे, याची काहीशी कल्पना येऊ शकते.

 • Share this:
  नवी दिल्ली, 10 जून : गुगलने (Google) आपल्या इव्हेंटमध्ये Android 12 सह अनेक नव्या गोष्टींची घोषणा केली होती. परंतु यापैकी काही गोष्टी विशेषही आहेत. गुगलने हेल्थसंबंधी एका टूलची घोषणा केली. गुगलच्या या टूलसाठी आर्टिफिशियल इंटेलिजेन्सची (AI) मदत घेण्यात आली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेन्स बेस्ड या टूलमुळे लोकांच्या स्किन, हेअर आणि नखांची ओळख केली जाईल. कंपनीने आपल्या इव्हेंटमध्ये याचा एक प्रिव्ह्यूही दाखवला होता. Google ने दिलेल्या माहितीनुसार, लोक आपल्या फोन कॅमेराने स्किनवर जेथे प्रोब्लेम आहे, तिथे फोटो क्लिक करू शकतात. समजा, जर हातावर एखाद्या ठिकाणी कुठे डाग असेल, किंवा जळजळ होत असेल, तर त्या जागेचा फोटो क्लिक करुन या टूलची मदत घेता येऊ शकते. फोटो क्लिक केल्यानंतर युजर्सला अनेक प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. काय लक्षणं आहेत, स्किन टाईप काय आहे असे प्रश्न असू शकतात. त्यानंतर युजरला नेमका त्रास किंवा समस्या काय आहे, हे सांगावं लागेल. हे पूर्णपणे अचूक नसेल, परंतु यामुळे संभाव्य परिस्थिती जाणून घेण्यास मदत होईल, असंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. Googleने आपल्याच CEOच्या वाढदिवसाच्या तारखेत केला गोंधळ;सर्चमध्ये 2 तारखा समोर हे टूल कोणत्याही समस्येचं निदान करण्यासाठी नसल्याचं Google ने स्पष्ट केलं आहे. म्हणजेच समस्येवर केवळ डॉक्टरचं उपचार करतील. पण या टूलमुळे स्किनमध्ये काय समस्या आहे, याची काहीशी कल्पना येऊ शकते. 288 संभावित स्किन कंडिशनसह या टूलला ट्रेन करण्यात आलं आहे, जेणेकरुन स्किन पाहून हे टूल समस्येबाबत सांगू शकेल. गुगल हेल्थ चीफ हेल्थ ऑफिसर Karen DeSalvo यांनी सांगितलं, की लोक आपल्या त्वचेसंबंधी प्रश्न विचारण्यासाठी गुगलकडे येतात. गुगलने एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी स्किनसंबंधी 1 अब्ज समस्या येतात. हा आकडा अतिशय मोठा आहे. त्यामुळेच कंपनीने AI आधारित नवं फीचर आणणार आहे. या मेसेजद्वारे Airtel, Jio Vodafone ग्राहकांची होतेय फसवणूक, असं राहा सुरक्षित कसं काम करते ही टेक्नोलॉजी - गुगलने यासाठी अशा अनेक फोटोंनी या टूलला ट्रेन केलं आहे, जिथे स्किन प्रोब्लेम दाखवले गेले. यात स्किन पाहिल्यानंतर आणि युजरद्वारे सांगितल्या गेलेल्या लक्षणांनंतर स्किनमध्ये काय समस्या आहे, हे टूल ठरवतं. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे टूल 1000 स्किन इमेजसह ज्यावेळी टेस्ट करण्यात आलं, त्यावेळी हे 84 टक्के वेळा स्किन प्रोब्लेमबाबत जे टॉप 3 सल्ले देतं, ते योग्य असतात. त्यामुळे समस्येबाबत अचूकपणेही सांगितलं जाऊ शकतं.
  Published by:Karishma Bhurke
  First published: