नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : गुगलचे (Google) सर्वच अॅप जवळपास प्रत्येक अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये (Android Smartphone) असतात. यापैकी जीमेल (Gmail) हे ऑफिशियल कामासाठी सर्वाधिक वापरलं जाणारं App ठरतं. Gmail वापरायला सोपं असून सर्व सुविधायुक्त आहे. आता जीमेलवर गुगलने आणखी एक नवं फीचर आणलं आहे.
Voice Calls -
गुगल Gmail मध्ये नवं अपडेट आणणार आहे. यात फोन कॉल फीचर जोडण्यात येणार आहे. हे फीचर जीमेलमध्ये आल्यानंतर युजर्स इतर अॅप्सवर ज्याप्रमाणे व्हॉईस कॉल्स करतात, त्याचप्रमाणे जीमेलवरही Voice Call करू शकतील. गुगल जीमेलला अशा प्लॅटफॉर्ममध्ये बदलण्याचा प्रयत्न करत आहे, जे प्रोफेशनल आणि पर्सनल दोन्ही युजर्ससाठी फायदेशीर ठरेल.
Google ने या फीचरला अधिकृतपणे Ring असं नाव दिलं आहे. Gmail वर एका लहानशा टॅबमध्ये हे फीचर फीट केलं जाईल. जर युजरला या टॅबचा वापर करायचा नसेल, तर ते हे टॅब हाईडही करू शकतात. अद्याप युजर लिंक असलेल्या ईमेल अॅड्रेसद्वारे (Email ID) फोन कॉल करू शकतील, की युजरला आपला फोन नंबर अॅपशी लिंक करावा लागेल याबाबत कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. सध्या या फीचरवर काम सुरू असून लवकरच लाँच केलं जाईल, अशी माहिती आहे.
त्याशिवाय, गुगलचं (Google) ईमेल शेड्यूलिंग फीचर फायद्याचं ठरतं. ईमेल शेड्यूलिंग फीचर, ईमेल आपल्या हवं त्या वेळेत, हवं त्या तारखेला पाठवण्याची परवागनी देतं. गुगलने एप्रिल 2019 रोजी जीमेलमध्ये (Gmail) हे फीचर लाँच केलं होतं. Gmail वर ईमेल शेड्यूलिंग मोबाईल अॅप आणि डेस्कटॉप ब्राउजर दोन्हीवरही उपलब्ध आहे.
डेस्कटॉप ब्राउजर -
Gmail ओपन करा आणि कंपोजवर क्लिक करा. ईमेल आयडीसह मेल ड्राफ्ट करा. आता सेंडवर क्लिक न करता, सेंड बटणाच्या बाजूला असलेल्या छोट्या ड्रॉप डाउन अॅरोवर क्लिक करा आणि शेड्यूल सेंड निवडा.
मोबाईल ईमेल शेड्यूल -
Android किंवा iOS वर Gmail ओपन करा, कंपोजवर क्लिक करुन रिसिव्हरचा ईमेल आयडी टाकून मेल टाईप करा. वरच्या बाजूला तीन डॉट दिसतील, त्यावर क्लिक करुन शेड्यूल सेंडवर टॅप करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.