Home /News /technology /

Google चं जबरदस्त फीचर; अँड्रॉईड युजर्सला मिळणार भूकंपाचा अलर्ट

Google चं जबरदस्त फीचर; अँड्रॉईड युजर्सला मिळणार भूकंपाचा अलर्ट

अँड्रॉईड युजर्सकडे भूकंपाचा अलर्ट ऑन आणि ऑफ करण्याचाही पर्याय असेल. अमेरिकेतील वॉशिंग्टनच्या युजर्सला गेल्या वर्षी मे महिन्यात आलेल्या भूकंपाचा अलर्ट गुगलद्वारे मिळाला होता.

  नवी दिल्ली, 5 मे : देशासह जगभरात अनेकदा भूकंप होत असतात. याच पार्श्वभूमीवर Google काही देशांमध्ये भूकंप अलर्ट फीचर लाँच करणार आहे. Google चं हे भूकंप अलर्ट आधीपासूनच अमेरिकेतील काही भागांसाठी होतं, परंतु आता हे ग्रीस आणि न्यूझीलंडसाठीही जारी करण्यात आलं आहे. अँड्रॉईड युजर्सकडे भूकंपाचा अलर्ट ऑन आणि ऑफ करण्याचाही पर्याय असेल. अमेरिकेतील वॉशिंग्टनच्या युजर्सला गेल्या वर्षी मे महिन्यात आलेल्या भूकंपाचा अलर्ट गुगलद्वारे मिळाला होता. The Verge च्या रिपोर्टनुसार, Google च्या या सुविधेच्या काही सीमा आहेत. गुगलचा हा अलर्ट काही सेकंदापूर्वी मिळू शकतो, जो अधिक काळासाठी नाही आहे. भूकंप केंद्रापासून बरेच दूर असलेल्या लोकांना प्रथम, काही वेळ आधीच आणि अचूक भूकंपाविषयी माहिती मिळते. सध्या भारतात गुगलचं हे फीचर कधीपर्यंत लाँच होईल याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

  (वाचा - एखाद्याच्या मृत्यूनंतर फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरचं अकाउंट्सचं काय होतं?)

  Google ब्लॉगवर दिलेल्या माहितीनुसार, Google ने अँड्रॉईड फोनमध्ये 'Earthquake warning tool' सामिल केलं आहे. हे टूल सध्या कॅलिफोर्नियामध्ये रोलआउट करण्यात आलं आहे आणि तेथे राहणारे युजर्सचं याचा वापर करू शकतात.

  (वाचा - 'वर बघा नाही तर आदळाल'; चालताना मोबाईल वापरणाऱ्या युजर्सला Google करणार अलर्ट)

  'Earthquake warning tool' मुळे अँड्रॉईड फोनवर (Android) भूकंपाचा अलर्ट मिळेल. आयओएस युजर्ससाठी याचं अपडेट कधी येणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. हे टूल केवळ अँड्रॉईड फोन युजर्ससाठीच असेल. गुगल अँड्रॉईड डिव्हाईसमध्ये भूकंप अलर्ट पाठवण्यासाठी यूएस जियोलॉजिकल सर्वेसह एकत्रित काम करत आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Earthquake, Google, Tech news

  पुढील बातम्या