काय सांगता! Google ची 'ही' 16 वर्षं जुनी सुविधा लवकरच होणार बंद

गुगल बुकमार्क्सच्या पेजवरील बॅनरवर याबाबत सूचना देण्यात आली आहे.

गुगल बुकमार्क्सच्या पेजवरील बॅनरवर याबाबत सूचना देण्यात आली आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली : गुगल (Google) हे आपल्या दैनंदिन वापरातील महत्वाचं सर्च इंजिन आहे. गुगलची क्रोम, फोटोज आदी फिचर्स आपण रोज वापरतो. महत्वाची माहिती, डेटा आदी सर्चिंग करण्यासाठी गुगलचा वापर केला जातो. त्यामुळे गुगल युजर्ससाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. कारण गुगल आपसं एक जुनं फिचर (Feature) लवकरच बंद करणार आहे. 30 सप्टेंबर 2021 रोजी गुगल बुकमार्क्स (Google Bookmarks) हे फिचर सर्व युजरसाठी बंद करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. गुगल बुकमार्क्सच्या पेजवरील बॅनरवर याबाबत सूचना देण्यात आली आहे. जाणून घेऊया याविषयी सविस्तर. गुगल हे सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन असून, या सर्च इंजिनसोबत गुगलची अन्य फिचर्सही तितकीच लोकप्रिय आहेत. गुगल आपल्या फिचरर्सच्या अनुषंगाने सातत्याने नवे अपडेट देत असते. युजर्सना अधिक चांगली सुविधा मिळावी ही यामागील भूमिका असते. नुकतीच गुगलने एक महत्वपूर्ण अशी घोषणा केली असून, त्यानुसार गुगल बुकमार्क्स ही 16 वर्ष जुनी आणि फारशी लोकप्रिय नसलेली सुविधा आता सर्व युजर्ससाठी बंद होणार आहे. 30 सप्टेंबर 2021 पासून याची अंमलबजावणी होणार असून त्याबाबतची सूचना गुगलने बुकमार्क्स पेजवरील बॅनरच्या माध्यमातून दिली आहे. त्यामुळे बुकमार्क्ससवरील सर्व डेटा गुगलने युजर्सला एक्सपोर्ट (Export) करायला सांगितला आहे. ही सुविधा बंद होणार असल्याने त्याचा परिणाम गुगल मॅप्सवर (Google Maps) होण्याची शक्यता आहे. हे वाचा - Netflix सब्सक्रायबर्ससाठी Good News! आता गेमिंग अ‍ॅप मिळणार मोफत अन्य वेबसाइटवरील ठिकाणांची माहिती अशी सेव्ह करा गुगल मॅप्सवर युजर्स आपल्या आवडत्या ठिकाणांचा डेटा एका लिस्टमध्ये एकत्रित ठेवू शकतो आणि नंतर तो पडताळू शकतो. जर एखाद्या वेबसाईटवर गुगल मॅप्स वर एम्बेडेड मॅप्स (Embedded Maps) असेल तर युजर तो गुगल मॅप्सवर सेव्ह करु शकतो. यासाठी त्या वेबसाईटवर क्लिक करुन तुम्हाला हव्या असलेल्या ठिकाणाची माहिती मिळवण्यासाठी मॅपवरील त्या ठिकाणावर क्लिक करावे आणि त्यानंतर सेव्हवर क्लिक करुन लिस्ट निवडावी. तुम्हाला स्टार आणि वेबसाइटचे नाव तुमच्या डेस्कटॉप किंवा मोबाईलवर दिसू लागेल. गुगल मॅप्सवर अशी सेव्ह करा ठिकाणांची माहिती गुगलच्या बुकमार्क्सबाबतच्या निर्णयाचे वृत्त टीव्ही9 हिंदीने दिलं आहे. गुगल बुकमार्क्स बंद झाल्यावर गुगल मॅप्सवरील काही फिचर्सबाबत अडचणी उदभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण हे फिचर्स बुकमार्क्सशी संबंधित आणि सिंक आहेत. गुगल बुकमार्क्स बंद झाल्यानंतर Starred लोकेशन देखील डिलिट होणार किंवा नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. 9 to 5 Google ने दिलेल्या माहितीनुसार, हे टाळण्यासाठी युजर्सने मॅप्समधून सेव्ह केलेली ठिकाणांची यादी केवळ starred लिस्ट बुकमार्क्ससह सिंक होण्यासाठी स्विच करावी. तसेच आपल्या आवडत्या ठिकाणांचा डेटा एकाच लिस्टमध्ये ठेवण्यासाठी गुगल मॅप ओपन करुन क्लिक करत किंवा बिझनेस, प्लेस, लॅटिट्यूट, लाँजिट्युड सर्च सेट करुन सर्च करावी. आणि ती आपल्या लिस्टमध्ये सेव्ह करावी. म्हणजे ही सेव्ह केलेली माहिती केवळ युजरच शोधू शकेल. बुकमार्क्सवरील डेटा असा करा एक्सपोर्ट गुगल बुकमार्क्स सुविधा 30 सप्टेंबर 2021 ला बंद होणार असल्याने गुगलने बुकमार्क्सवरील सर्व डेटा एक्सपोर्ट करण्याच्या सूचना युजरना दिल्या आहेत. यासाठी युजर्सने google.com/bookmarks वर जात Export Bookmarks वर क्लिक करावे. त्यानंतर युजर आपला डेटा कॉपी करु शकणार आहे.
    First published: