मुंबई, 10 सप्टेंबर : इंटरनेट सर्च इंजिन गुगल (Google) ने अँड्रॉइड (Android) युजर्ससाठी नवीन फीचर ‘Verified Calls’लाँच केले आहे. कंपनीने हे फीचर 5 देशात लाँच केले आहे, ज्यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. या फीचरच्या मदतीने युजर्सना स्पॅम कॉलबाबत समजू शकेल. गुगलचे हे फीचर युजरना सांगेल की कोण कॉल करत आहे आणि कारण काय आहे, त्याचप्रमाणे कॉलरचा लोगो देखील दाखवण्यात येईल. फ्रॉड कॉलवर रोख आणणे हे या फीचरमागचे महत्त्वाचे कारण आहे.
हे फीचर भारतात, स्पेन, ब्राझील, मेक्सिको आणि यूएससह जगभरात रोलआऊट करण्यात येत आहे. याशिवाय बिझनेसचा व्हेरिफाइड बॅच देखील गुगलकडून व्हेरिफाय करण्यात आलेल्या क्रमांकावर दिसेल. गुगलचे नवे फीचर युजर्सना सांगेल की त्यांना करण्यात आलेल्या बिझनेस कॉलचे कारण काय आहे, हे फीचर अद्याप TrueCaller या app मध्ये नाही आहे.
(हे वाचा-आठवड्याला तीन दिवस सुट्टी; Google कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी)
It's easy to miss important calls from businesses, like from your bank or food delivery service, because you don't want to answer an unknown caller. We're working to fix that with Verified Calls on Google's Phone app → https://t.co/4Llxn1Grm1 pic.twitter.com/G1f12z3VsG
— Google (@Google) September 8, 2020
गुगलने एका ब्लॉग पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, या पायलट प्रोजेक्टचे सुरुवातीचे रिझल्ट्स खूप चांगले आहेत. युजर्सना याचा फायदा मिळेल.
(हे वाचा-PM शेतकरी सन्मान योजनेमध्ये 110 कोटींचा घोटाळा, 80 अधिकारी बरखास्त)
सध्या अशाप्रकारचे फीचर TrueCaller या अॅपमध्ये मिळते आहे, जो युजरना अनोळखी कॉलबाबत माहिती देतो. गुगल Verified Calls च आता TrueCallerचे काम करेल. हे फीचर युजर्सची अनेक कामे सुखकर करेल. युजर्सना या फीचरसाठी कोणतोही थर्ड पार्टी अॅप डाऊनलोड करावे लागणार नाही.