मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Google ने दिलं Holi सरप्राइज; आज हा शब्द गुगल सर्च करा आणि पाहा चमत्कार!

Google ने दिलं Holi सरप्राइज; आज हा शब्द गुगल सर्च करा आणि पाहा चमत्कार!

होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गुगलने एक वेगळी ट्रिक वापरली आहे. नेहमीच्या doodle पेक्षा वेगळं काही अनुभवायचं असेल तर एक शब्द Google Search करायलाच हवा आज. पाहा काय आहे गंमत...

    मुंबई, 10 मार्च : आज देशभरात फक्त होळीचीच चर्चा आहे. होळीनिमित्त सर्वत्र रंगांची उधळण पाहायला मिळत आहे. कुणी आपल्या जीवलगांबरोबर होळीचा सण साजरा करण्यासाठी गावी गेलेलं आहे तर कुणी कुठल्या पर्यटनस्थळावर. पण सगळीकडे या वेळी होळीसाठी Google ने साथ दिलेली दिसते. दिवसभरात भारतात Google वर सर्वाधिक Search झालेली शब्द आहे 'होली गाना'. म्हणजे होळीची गाणी लोकांनी इंटरनेटवर भरपूर सर्च केली आहेत. Google ने सुद्धा यूजर्जना होळीचं एक छान सरप्राइज दिलं आहे. तुम्ही Holi  हा शब्द दिवसभरात Search केलात का? नसेल तर आत्ता करून पाहा. होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गुगलने एक ट्रिक आणली आहे. ही पद्धत फार आकर्षक आणि गुगल युजर्सना भुरळ पाडणारी आहे. ही ट्रिक वापरल्यानंतर आपल्या मोबाईल फोनसोबतच होळी खेळत राहाल. गुगलवर जेव्हा आपण कुठलाही शब्द माहिती मिळवण्यासठी टाइप करतो तिथे फक्त ‘Holi’ हा शब्द टाइप करायचा आहे. हा शब्द टाइप केल्यानंतर युजर्सना रंगांनी भरलेलं एक पॅलेट त्यांच्या स्क्रिनवर दिसेल. त्यावर आपण पुढे जसं जसं क्लिक करत जाऊ तसतसं स्क्रिनवर आणखी रंग वाढत जातील. आणि काही वेळानंतर संपूर्ण स्क्रीनवरच रंगांची उधळण झालेली दिसेल. कुठल्या गुगल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध? गुगलने अँड्रॉइड मोबाईल युजर्स, गुगल फोन्स, मोबाईल वेबवरसुद्धा ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासोबतच Apple  युजर्सना सुद्धा मोबाईलवर होळी साजरा करता येणार आहे. वाचा - फेसबुकने केला तब्बल 3 लाख लोकांचा डेटा लीक, भरावा लागणार कोट्यवधींचा दंड दरम्यान हे रंग जर कुणाला स्क्रिनवर नको असतील तर त्यासाठीसुद्धा गुगलने सुविधा केलेली आहे. आपल्या मोबईल स्क्रीनवर गुगलने एका पाण्याच्या थेंबाचं चिन्ह दिलेलं आहे. त्यावर टच करताच आपली स्क्रीन पाण्याने धुतल्याप्रमाणे स्वच्छ होऊन जाईल. म्हणजेच आपल्याला आता गुगलवर सुद्धा होळी खेळता येणार आहे. मुळात गुगल नेहमीप्रमाणे प्रत्येत सण किंवा मोठा दिवस आला की आपल्या युजर्सना अशा आकर्षक पद्धतीने शुभेच्छा देण्यासाठी कुठेच मागे राहिलेलं नाही. त्यामुळे जर कुणाला खऱ्या-खुऱ्या रंगांनी होळी खेळायची नसेल तर त्यांच्यासाठी गुगल होळीचा हा पर्याय कधीही उत्तमच! अन्य बातम्या होळीच्या दिवशी सासरी जाणं नववधूला पडलं महागात; स्टेशनवर पोहोचली पण... भयंकर! मानवी हात आणि बोटं त्यानं कढईत शिजत ठेवली; बायकोनं पाहिलं आणि...
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Google

    पुढील बातम्या